शिंदे गट उच्च न्यायालयात, ‘त्या’ प्रकरणात ठाकरे गटाविरोधात याचिका दाखल
Bharat Gogawle : शिवसेना (Shiv Sena) फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
या बातमीनुसार शिंदे गटाकडून मुंबई उच्च न्यायालयात ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा या प्रकरणावरून आता आरोप- प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार भरत गोगावले (Bharat Gogawle) यांनी दिली आहे.
याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह आमच्याकडे आहे. त्यामुळे आमची शिवसेना खरी शिवसेना आहे. ते शिवसेना नाही. ठाकरे गटाकडून आमच्या व्हिपचे पालन करण्यात येत नाही. त्यामुळे आता आम्ही त्यांना लवकरात लवकर अपात्र ठरवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. असं आमदार भरत गोगावले म्हणाले.
पुढे बोलताना भरत गोगावले म्हणाले की, उच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यांना आमच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. ते काही करू शकतात त्यांना जाऊ द्या, पण विजय आमचाच होणार असं देखील यावेळी भरत गोगावले म्हणाले.
अहमदनगरमध्ये ACB ची मोठी कारवाई, महिला मंडलाधिकारी,तलाठी लाचेच्या जाळ्यात
शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला 09 तर शिंदे गटाला 07 जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.