Bombay High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांची भरती, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

  • Written By: Published:
Bombay High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांची भरती, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Bombay High Court Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक गुड न्यूज आहे. मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे, या भरतीसाठी चौथी पास ते पदवीधारकांपर्यंत कोणीही अर्ज करू शकतं. मुंबई उच्च न्यायालयांतर्गत सहाय्यक ग्रंथपाल, स्वयंपाकी, माळी या पदांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. मुंबई उच्च न्यायालय भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घ्या.

Maratha Reservation : जरांगेंचे उपोषण मागे घेण्यासाठी मध्यस्थी करणारे न्यायमूर्ती शुक्रे, गायकवाड कोण? 

पदाचे नाव – असिस्टंट लायब्रेरिअन, स्वयंपाकी, माळी

एकूण रिक्त पदे – 8

शैक्षणिक पात्रता –
सहाय्यक ग्रंथपाल: कोणत्याही शाखेतील पदवी + ग्रंथालय आणि माहिती विज्ञानातील प्रमाणपत्र + MS-CIT + 3 वर्षांचा अनुभव.
कुक: चौथी पास + पूर्ण ज्ञान आणि स्वयंपाकाचा अनुभव.
माली: चौथी पास + 3 वर्षांचा अनुभव.

वय श्रेणी –
खुला प्रवर्ग – 21 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय – 5 वर्षांची सूट.

अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग, मागासवर्ग – रु. 200.

नोकरी ठिकाण – नागपूर.

अर्ज करण्याची सुरूवात – 30 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याचा पत्ता – प्रबंधक (प्रशासक), मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, सिव्हिल लाइन्स नागपूर – 400001

निवड प्रक्रिया –
i) पात्र उमेदवारांची निवड ही चाचणीच्या माध्यमातून केली जाईल. 100 गुणांची टेस्ट असेल. ज्यामध्ये खालील प्रश्न आहेत:
अ) सामान्य इंग्रजी
ब) ग्रंथालय आणि माहिती विज्ञान
क) संगणकाचे ज्ञान
किमान उत्तीर्ण होण्यासाठी 50 गुण आवश्यक आहेत.

जाहिरात-

सहाय्यक ग्रंथपाल – https://drive.google.com/file/d/1rKdmik_jsAzzOFMTGrgo_6TjCIH_8lih/view

कुक – https://drive.google.com/file/d/1yWcdeIhJnrjPQQaBH9D-_k9tl4FC3f8t/view

माली – https://drive.google.com/file/d/1qFyv0n_tGD6oU1KouovVrEq8dMEmuJge/view

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube