पैसे नाहीत, वित्त विभागाच विरोध, योजना गुंडळणार? लाडक्या बहिणींना अजितदादांचा ‘वादा’
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करताना आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला वर्गाला आकर्षित करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin) योजनेची घोषणा केली होती.
या योजनेअंतर्गत राज्य सरकार महिलांना दरमहा 1500 रुपये देणार आहे. त्यामुळे सध्या या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. तर दुसरीकडे या योजनेला वित्तविभागाचा विरोध असल्याची माहिती शुक्रवार (27 जुलै) काही मीडिया रिपोर्टमध्ये देण्यात आली होती. त्यानंतर या योजनेवरून विरोधकांनी महायुतीवर (Mahayuti) हल्लाबोल केला होता. मात्र आता या योजनेला वित्तविभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित असून असल्याने प्रसारमाध्यमांनी या बिनबुडाच्या बातम्या थांबवावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले की, राज्याचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी ही योजना राज्याच्या वर्ष 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे. या योजनेची घोषणा करण्यापूर्वी मी वित्त व नियोजन, सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेतली आहे. या योजनेसाठी आवश्यक एकूण 35 हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद चालू आर्थिक वर्षात करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसे कुठून आणणार?, हा प्रश्न उद्भवत नाही. महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे असं अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना राज्याच्या वर्ष 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे. वित्त व नियोजन, सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 27, 2024
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, या राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. त्यामुळे या योजनेला कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही असं अजित पवार म्हणाले.
तसेच 26 जुलै रोजी काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित असल्याने प्रसारमाध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे थांबवावे असा आवाहन देखील अजित पवार यांनी केला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेत अर्ज करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक
आधार कार्ड
अधिवास\जन्म प्रमाणपत्र
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
अर्जदाराचे हमीपत्र
बॅंक पासबुक
काय केलं साहेबांनी? अमित शाहानंतर नरेंद्र मोदींवर शरद पवारांचा हल्लाबोल
अर्जदाराचे फोटो