Olympics 2024 मधील यशामागे वडिलांचा मोठा त्याग; कसा आहे मनू भाकरचा प्रेरणादायी प्रवास?
Olympics 2024 Successes Story of Manu Bhakar Wins Bronze in Shooting : भारताने पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) स्पर्धेत दुसऱ्या दिवशी पदकाचं खातं उघडलं आहे. भारतीय नेमबाज मनू भाकरने (Manu Bhakar) कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. मात्र मनूच्या या यशामागील वडिलांचा मोठा त्याग अन् तिचा इथवरचा प्रवास देखील अत्यंत प्रेरणादायी आहे. कधी बॉक्सिंग कधी मार्शल आर्ट करणारी मनू नेमबाज कशी बनली पाहूयात…
मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा गर्व, 29 तारखेला पाडापाडीचा निर्णय घेणार; जरांगेचा सरकारला इशारा
मनू भाकर ही मूळची हरियाणातील झज्जर येथील आहे. तिचा जन्म 18 फेब्रुवारी 2002 रोजी झाला आहे. लहानपणापासूनच तिला विविध खेळांमध्ये रस होता. ज्यामध्ये बॉक्सिंग, टेनिस, स्केटिंग यासारख्या खेळांचा समावेश होता. मात्र नेमबाजीमध्ये तिने तिच्या नशीब आजमावलं. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी म्हणजे 2017 मध्ये तिने तिच्या आंतरराष्ट्रीय करिअरला सुरुवात केली. तर 2018 मध्ये तिने आयएसएसएफ विश्व कप स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्टल स्पर्धेत दमदार कामगिरी केली आणि याच स्पर्धेत तिने तिच्या करिअरमधील पहिलं सुवर्णपदक जिंकलं.
Olympics 2024 : रमिता जिंदालची दमदार कामगिरी; 20 वर्षांनी भारतीय महिला शूटरने गाठली अंतिम फेरी
बॉक्सिंग आणि मार्शल आर्ट मध्ये देखील तिने पदकांना गवसणी घातली मात्र डोळ्यांना इजा झाल्याने तिचं या खेळांमध्ये करिअर संपलं. त्यानंतर वडील रामकिशन यांनी तिच्या हातात पिस्तूल दिल. त्यानंतर ती शाळा झाल्यानंतर दररोज सहा ते सात तास नेमबाजीचा सराव करत होते. तिची या खेळातील आवड जिद्द आणि चिकाटी पाहून तिच्या वडिलांनी संपूर्ण लक्ष तिच्याकडे देण्यासाठी स्वतःची नोकरी सोडली. त्यामुळे आपल्या या यशाचं श्रेय ती तिच्या आई-वडिलांना देते. ज्यांचा पाठिंबा आणि त्याग तिला इथपर्यंत घेऊन आला आहे.
Paris Olympics 2024 : मनू भाकरने रचला इतिहास, नेमबाजीत जिंकले कांस्यपदक
दरम्यान 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पिस्तुलच्या खराबीमुळे तिला पदक जिंकता आले नव्हते. त्यावेळी ती अत्यंत खचली होती. मात्र पॅरिस ऑलिम्पिक 2024 22 वर्षीय मनूने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल क्रीडा प्रकारात हे कांस्य पदक जिंकले. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे मनू ही शूटिंगमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
तर ऑलम्पिक मधील यशानंतर मनू भाकर हीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ज्यामध्ये ती म्हटली की, आपण या यशाने प्रचंड खुश आहोत. यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली. शेवटच्या शॉट्सपर्यंत प्रचंड ताकद लावली. त्यामुळे मी हे पदक जिंकू शकले. मात्र आशा करते की, पुढच्या वर्षी या पदकाचा रंग वेगळा असेल. तसेच मी श्रीमद् भगवद्गीता वाचते. ज्याप्रमाणे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करा. त्याच्या परिणामांवर नाही. माझे डोक्यात देखील हेच सुरू होतं. मी फक्त माझं काम करत राहील. बाकी जे होईल ते माझ्या नशिबाचा भाग असेल.