विजयानंतर पंतप्रधानांना भेटली महिला क्रिकेट टीम; हरमनप्रीतने सांगितला 2017 ‘तो’ किस्सा

Indian Women’s Cricket Team विजयानंतर पंतप्रधानांना भेटली यावेळी कॅप्टन हरमनप्रीतने मोदींशी 2017 साली केलेल्या भेटीची आठवण करून दिली.

Indian Women’s Cricket Team

Indian Women’s Cricket Team Meet to PM Modi after win ICC Women World Cup : मुंबईतील डी. वाय. पाटील मैदानावर झालेल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत पहिल्यांदाच विश्वचषकावर भारताचे नाव कोरले. त्यानंतर महिला टीमने लोक कल्याण मार्ग याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी कॅप्टन हरमनप्रीत कौरने पंतप्रधान मोदींशी 2017 साली केलेल्या भेटीची आठवण करून दिली. काय म्हणाली हरमनप्रीत जाणून घेऊ…

राज ठाकरेंसोबत ‘आघाडी’ ला नकार ; मनसे सोबत न जाण्यावर काँग्रेस ठाम?

यावेळी बोलाताना कॅप्टन हरमनप्रीत कौर म्हणाली की, 2017 ला वन डे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये इंग्लडकरून पराभव झाल्यानंतर पंतप्रधानांना भेटल्या होत्या त्यावेळी कॅप्टन मिताली राज होती. तेव्हा हरमनप्रीतने 51 रन्सची लढाऊ खेळी केली होती. ती म्हणाली तेव्हा आम्ही ट्रॉफीशिवाय तुम्हाला भेटलो होतो. मात्र आता आम्ही ट्रॉफीसह तुम्हाला भेटत आहोत. आमच्या टीमने वचन पूर्ण केलं. यासाठी त्यांना मोदींनी प्रेरित केल्याचं उपकॅप्टन स्मृती मानधना म्हणाली.

घोटाळा केला नाही, पार्थ पवारांचा दावा; दादांच्या ‘पार्थ’ वर कारवाईचा ‘चाबूक’? फडणवीसांच्या मनात काय?

तर यावेळी कॅप्टन हरमनप्रीत कौरने या विजयाचं श्रेय त्यांचे कोच अमोल मुझुमदार यांना दिलं. ती म्हणाली त्यांनी आम्हाला भूतकाळा विसरून वर्तमानात राहायला शिकवलं. तेच पंतप्रधान म्हणून तुम्हीही सांगितलं. तसेच महिला टीमच्या या पंतप्रधानांच्या भेटीमध्ये खेळाडूंनी मोदींना अनेक मिश्किल प्रश्न देखील विचारले. जसे, त्यांचं स्किनकेअर रूटीन. यावर उत्तर देताना मोदी म्हणाले की, मी इतक्या वर्षांपासून पंतप्रधान आहे. जनतेचे त्यांना जे आशीर्वाद मिळतात ते तेज त्यातून येत.

Abhijeet Sawant : ट्रीप एक कलाकार अनेक; गायक अभिजीत सावंतची स्टार स्टड दुबई ट्रीप

भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील हा एक अविस्मरणीय विजय ठरला आहे. (India vs Australia) 2025 महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पाणी पाजत महिला संघाने 52 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने 50 षटकात 7 गडी गमवून 298 धावा केल्या होत्या.

Larissa Brazilian Model : मी कधीही भारतात…, व्होट चोरीवर ब्राझिलियन मॉडेलचा धक्कादायक दावा

दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं लक्ष्य होतं. शेवटच्या चेंडूवर राधा यादव स्ट्राईकला होती. तिने फटका मारला आणि धावत सुटली. पण दोन धावा घेताना दीप्ती शर्मा 58 धावा करून रनआऊट झाली.या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुलवार्टनं शतकी खेळी केली केली. पण एका बाजूनं अपेक्षित साथ न लाभल्यानं तिचे प्रयत्न अपुरे ठरले. आणि भारतानं एका ऐतिहासिक विजयाला गवसणी.

 

follow us