नाईकांनी म्हटल्या प्रमाणे शिंदेंचा टांगा पलटी केलाच;नवी मुंबईत पुन्हा एकदा गणेश नाईकांचे वर्चस्व
Ganesh Naik यांनी एका भाषणात शिंदेंचा टांगा पलटी करून आपण सत्ता आणू असं थेट आव्हान देत शिंदेंना पराभूत करून दाखवलं आहे.
Ganesh Naik Win in Navi Mumbai Municiple Council as he gives Challenge to Eknath Shinde : राज्यातील मुंबई महानगर पालिकेसह राज्यातील अनेक महानगर पालिका चर्चेत राहिल्या त्या तेथील बालेकिल्ला असलेल्या नेत्यांच्या वादामुळे. त्यातील एक महानगर पालिका म्हणजे नवी मुंबई. येथे गेल्या 25 वर्षे सत्ता असलेले गणेश नाईक (Ganesh Naik) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. वाद विकोपाला गेल्यावर नाईकांनी एका भाषणात शिंदेंचा टांगा पलटी करून आपण सत्ता आणू असं थेट आव्हान देत शिंदेंना पराभूत करून दाखवलं आहे.
गेल्या २५ वर्षांच्या गणेश नाईक यांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका निवडणुकीत केला.मात्र, गणेश नाईक यांनी आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखत भाजपच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिका पुन्हा ताब्यात घेतली. प्रचारादरम्यान नाईक–शिंदे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडल्या. ‘टांगा पलटी’ आणि ‘घोडे फरार’ ही नाईकांची आक्रमक भाषा निवडणूक काळात विशेष चर्चेत राहिली. निवडणुकीनंतर भाजपकडून एकनाथ शिंदे यांचे टांग्याला लटकलेले फलक लावण्यात आल्याने हा वाद आणखी चिघळला आहे.
शब्दांशिवाय नात्यांची गोष्ट सांगणारं ‘माया’चं मोशन पोस्टर प्रदर्शित
नवी मुंबई महापालिकेच्या १११ जागांपैकी भाजपने ६५ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले. शिवसेना (शिंदे गट) ४२ जागांवर थांबली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना खातेही उघडता आले नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला केवळ दोन, मनसेला एक जागा मिळाली, तर एका अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला.
प्रभाग 41 मध्ये निवृत्ती अण्णा बांदलांनी दिला 6200 मताधिक्याने शिवसेनेच्या शहरप्रमुखाला धक्का!
महापालिकेच्या २८ प्रभागांतील १११ जागांसाठी ५०० उमेदवार रिंगणात होते. गुरुवारी झालेल्या मतदानात ५७.१५ टक्के मतदानाची नोंद झाली. या निवडणुकीत भाजपने संघटित प्रचारयंत्रणा, प्रभावी नेतृत्व आणि विकासकेंद्रित अजेंड्याच्या जोरावर ऐतिहासिक यश मिळवले. काही प्रभागांत शिवसेना (शिंदे गट) कडवी झुंज देताना दिसली; मात्र बहुमतापर्यंत पोहोचण्यात अपयश आले.
भोसरीचा पहिलवान अजितदादांवर कसा भारी पडला ?
या निकालामुळे नवी मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा गणेश नाईक यांचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे. नियोजनबद्ध शहरी विकास, पायाभूत सुविधा, नागरी सुविधा, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेवर दिलेल्या भराचा विश्वास मतदारांनी भाजपवर टाकल्याचे निकालातून स्पष्ट होते. प्रचार काळात भाजपने ‘स्थिर नेतृत्व, सातत्यपूर्ण विकास आणि सक्षम प्रशासन’ या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले होते. केंद्र व राज्य सरकारशी असलेली सुसूत्रता, निधी उपलब्धतेची हमी आणि मोठ्या प्रकल्पांना मिळणारी गती हे मुद्दे निर्णायक ठरले.
खैरे अन् दानवेंच्या वादाचा फटका; छत्रपती संभाजीनगरची महापालिका ठाकरेंच्या हातून निसटली
प्रचारादरम्यान गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सिडकोच्या जमिनी विक्रीतून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. भाजपच्या वरिष्ठांनी सांगितल्यास हा भ्रष्टाचार उघड करणार आणि ‘टांगा पलटी, घोडे फरार’ करणार, असे आव्हानही त्यांनी दिले होते. निवडणूक निकालानंतर नाईकांनी आपला शब्द खरा करून दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
रविंद्र चव्हाण; पक्षासाठी 24 तास समर्पित कार्यकर्ता कसा ठरला भाजपच्या विजयाचा शिल्पकार?
एकूणच, नवी मुंबई महापालिकेचा हा निकाल केवळ पक्षीय विजय-पराजयापुरता मर्यादित न राहता नाईक–शिंदे वाद, भ्रष्टाचाराचे आरोप आणि आक्रमक राजकीय भाषेमुळे राज्याच्या राजकारणावरही परिणाम करणारा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतदारांनी शहराच्या विकासासाठी मजबूत आणि स्थिर नेतृत्वाला पसंती दिल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
