Download App

शाहांची भेट ते महायुतीला पाठिंबा; राज ठाकरेंच्या भाषणात काय काय?

Raj Thackeray News : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) नेमकी भूमिका काय असणार? याकडं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज जाहीर मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मंत्री अमित शाहा यांच्या भेटीनंतर घडलेल्या घडामोडींवर थेट भाष्य केलं आहे.

केजरीवालांना दणका! अटक नियमानुसारच झाली, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

काही दिवसांपूर्वीच अमित शाहा यांच्या भेटीला राज ठाकरे दिल्लीत गेले होते. या भेटीवरुन विरोधकांकडून त्यांच्यावर सडकून टीका केली जात होती. राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अध्यक्ष होणार असल्याचं सांगितलं जात होतं. या संपूर्ण घडामोडींवरुन राज ठाकरे यांनी विरोधकांच्या प्रत्येक टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

राज ठाकरे यांनी अमित शाहांची भेट घेतली. ही राजकीय भेट असल्याचं सांगण्यात येत होतं. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये निवडणुकीबाबत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, तुम्ही आमच्या चिन्हावर निवडणूक लढवा, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, माझ्या पक्षाचं चिन्ह रेल्वे इंजिन असून ते कार्यर्त्यांनी कमावलेलं आहे, ते आयात केलेलं नाही. चिन्हाबाबत तडजोड होऊ शकत नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. जागावाटपावर चर्चा झाली पण 1995 साली मी शेवटच्या जागावाटपाच्या चर्चेवर बसलो होते त्यानंतर कधीच बसलो नाही. तू दोन घे.. तीन घे.. मला ही दे.. असं मला जमत नसल्याचंही राज ठाकरेंनी थेट सांगून टाकलं आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” चं पहिलं पोस्टर रिलीज

एकाला संधी दिली पण त्याला समजलंच नाही..
मला शिवसेनेचा अध्यक्ष व्हायचं असतं तर तेव्हाच नसतो का झालो? तेव्हा मी स्पष्ट सांगितलं मला पक्ष फोडून काहीही करायच नाही. स्वत: चा पक्ष काढीन पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. बाळासाहेबांशिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही, तरीही एकाला संधी दिली होती त्याला समजलच नाही. तो आता भूतकाळ झाला असल्याची टीकाही राज ठाकरे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

निवडणूकीच्या काळामध्ये डॉक्टर आणि नर्सेसची ड्यूटी लावण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात डॉक्टर मतदारांची नाडी आणि नर्सेस मतदारांचे डायपर बदलणार आहेत काय? राज्यातील डॉक्टर आणि नर्सेसने कोणत्याही निवडणुकीच्या ड्यूटीसाठी जाऊ नये, तुम्हाला नोकरीवरुन कोण काढतो ते मी बघतो, असा इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.

दरम्यान, मी देवेंद्र फडणवीस यांना म्हटलं की, मला कोणत्याही वाटाघाटी नको. मी त्यांना सांगितलं की, मला राज्यसभा ही नको विधानपरीषद ही नको. पण या देशाला चांगल्या आणि खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यांच्याकडून माझ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा माझा पक्ष राज्यातील महायुती म्हणजेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, असल्याचे राज ठाकरे यांनी घोषित केले.

follow us