Download App

MNS vs Udhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर ‘नियती’नेच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय

मुंबई : ‘उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख पदावर ‘नियती’नेच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.’ असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते तथा सचिव योगेश खैरे यांनी राज ठाकरे यांचा जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना कार्याध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा केल्याचं पाहा मिळत आहे. तर पुढे ते त्यांच्या या घोषणेवर स्पष्टीकरण देत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट असा संघर्ष सुरू झाला आहे. राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे गट व शिंदे गटात धनुष्यबाण या पक्षाच्या चिन्हासाठी लढाई सुरु झाली. राज्यात गेल्या काही महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरतं गोठवलं आणि ठाकरेंना मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं. त्यानंतर धनुष्यबाण या शिवसेनेच्या मूळ चिन्हावर दोन्ही गटांनी दावा केलाय.

सत्तासंघर्षाची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरु असतानाच आता शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ येत्या 23 जानेवारीला संपणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सलग दुसऱ्यांदा 2018 मध्ये निवड झाली होती. आता शिवसेना पक्षाचा नवा पक्षप्रमुख कोण असणार? याची उत्सुकता शिवसैनिकांसह सर्वांनाच लागलीय.

यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार अनिल देसाई यांनी भूमिका स्पष्ट केलीय. आमच्या वकिलांकडून उध्दव ठाकरे यांचा कार्यकाळ संपण्याआधी पक्षांतर्गत निवडणुका घेऊ देण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केलीय. यामध्ये राष्ट्रीय कार्यकारणी आणि पदाधिकाऱ्यांची निवड देखील करण्यात येणार असल्याचं अनिल देसाईंनी स्पष्ट केलंय.

आयोगाला पक्षांतर्गत निवडणुका घेण्याबाबत आक्षेप असेल तर उध्दव ठाकरेंची पक्षप्रमुख पदाची मुदत वाढवण्याची मागणी देखील ठाकरे गटाकडून करण्यात आलीय. तर दुसरीकडे विधानसभेसह लोकसभेत ज्यांच्याकडे बहुमत असेल तर त्यांनाच पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळण्याची मागणी शिंदे गटाकडून निवडणुक आयोगाकडे करण्यात आलीय.

follow us