Download App

धंगेकरांचा अप्रत्यक्ष प्रचार करणे ही महागात पडले : मनसेतून थेट हकालपट्टी

  • Written By: Last Updated:

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील शहर पदाधिकाऱ्यांपैकी संजय भोसले (Sanjay Bhosale) यांना पक्षातील सर्व पदांवरून बडतर्फ करण्याची कारवाई करून अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षात शिस्तभंग खपवून घेतली जाणार नाही, असा संदेश सर्व कार्यकर्त्यांपर्यंत दिला आहे. या कारवाईमुळे मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकारी संजय भोसले ह्यांनी समाजमाध्यमांवर पक्षातील नेत्यांचा थेट नामोल्लेख टाळत, पण सगळ्यांना कळेल अशा पद्धतीने शेरेबाजी केली होती. त्यानंतर खुद्द राज ठाकरेंनी या प्रकरणाची दखल घेतली असून मनसेनं संजय भोसले यांना पदमुक्त केलं आहे. पक्षातील नेत्यांवर शेरेबाजी करणं ही बाब अतिशय गंभीर असून अशा पध्दतीने आदेशाचा भंग करणाऱ्याला खरंतर पक्षातून थेट काढून टाकलं जाईल, असं मनसेच्या वतीने शिरीष सावंत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. सावंत यांनी या पत्रकात सांगितलं आहे की, तुमच्या काही तक्रारी असतील तर एकतर संबंधित नेत्यांशी बोला किंवा थेट राजसाहेबांशी बोला, परंतु, तरी देखील कोणी आगाऊपणाने माध्यमावर आणि समाज माध्यमांवर व्यक्त होणार असेल तर त्यांनी प्रथम राजीनाम द्यावा. अन्यथा योग्य कारवाई करण्यात येईल असं सांगितलं.

मनसेचे पत्र-
२१ डिसेंबर २०२२ रोजी सन्माननीय राजसाहेबांनी पत्राद्वारे माध्यमांमध्ये आणि समाज माध्यमांमध्ये पक्षाच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करणाऱ्या उथळवीरांना पक्ष शिस्तभंगाच्या कारवाई बाबत कडक शब्दांमध्ये इशारा दिला होता. त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, तुमच्या काही तक्रारी असतील तर एकतर संबंधित नेत्यांशी बोला किंवा थेट राजसाहेबांशी बोला, परंतु, तरी देखील कोणी आगाऊपणाने माध्यमावर आणि समाज माध्यमांवर व्यक्त होणार असेल तर त्यांनी प्रथम राजीनाम द्यावा.

राजसाहेबांचा आदेश हा आपल्या सगळ्यांना शिरसावंद्या आहे. पण तरीही पुण्यातील महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकारी श्री संजय भोसले ह्यांनी, ह्या आदेशाचे उल्लंघन करत, समाजमाध्यमांवर पक्षातील नेत्यांचा थेट नामोल्लेख टाळत, पण सगळ्यांना कळेल अशा पद्धतीने शेरेबाजी केली आहे.

ही बाब अतिशय गंभीर असून मा. राजसाहेबांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. अशा पध्दतीने आदेशाचा भंग करणाऱ्याला खरंतर पक्षातून थेट काढून टाकलं जाईल. फक्त श्री संजय भोसले यांनी नामोल्लेख टाळल्यामुळे, त्यांना पक्षातून काढून न टाकता, कडक समज म्हणून पक्षातील सर्व पदांवरून मुक्त करण्यात येत आहे, ह्याची नोंद घ्यावी.
भविष्यात अशा प्रकारची शिस्तभंगाची वर्तणूक कोणाकडू घडू नये, हिच अपेक्षा.

 

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा आलेख चढता

 

 

Tags

follow us