Download App

अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनसेचं टीकास्त्र

  • Written By: Last Updated:

पुणे : ‘हा छत्रपती संभाजी महाराजांच्या आज्ञापत्राचा गोव्यातील हडकोळण गावातील शिलालेख आहे. यात दोन वाक्ये आहेत…. 1) आता हे हिंदू राज्य जाहले 2) धर्मकृत्याचा नाश करू नये ! दादा…. छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’च होते. धर्मासाठी त्यांनी जीवाची पर्वा केली नाही !!’ अशी टीका आपल्या फेसबुक पोस्टद्वारे मनसेचे पुण्यातील प्रवक्ते योगेश खैरे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर केली आहे.

शुक्रवारी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदीर टीका केली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर दिले. अजित पवार म्हणाले, ‘छत्रपती संभाजी राजे हे धर्मवीर नव्हते, ते स्वराज्यरक्षक होते. आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही.’बाल शौर्य पुरस्कार’ हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी द्यावा. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही.’

शुक्रवारी नुकतच राज्याचं हिवाळी अधिवेशन समाप्त झालं. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दिनांक 19 डिसेंबर 2022 ते दिनांक 30 डिसेंबर 2022 दरम्यान नागपूर येथे पार पडले. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना चांगलेच घेरले. यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसह शिंदे गटाच्या मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरले होते.

Tags

follow us