मनसेच्या वसंत मोरेंचा सुप्रिया सुळेंच्या गाडीतून प्रवास, मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

MNS’s Vasant More’s journey in Supriya Sule’s CAR : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) पुणे शहरातील नेते वसंत मोरे (Vasant Moreहे मनसेत नाराज असल्याच्या बातम्या अधूनधून येत असतात. मनसेच्या अनेक कार्यक्रमांत मोरेंना डावलण्यात आले. मनसेने अनेकदा डावलल्याने वसंत मोरेंनी अनेकदा नाराजी व्यक्त केली. त्यामुळं गेल्या वर्षभरापासून मनसेत वसंत मोरे हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू […]

Untitled Design   2023 04 13T090114.362

Untitled Design 2023 04 13T090114.362

MNS’s Vasant More’s journey in Supriya Sule’s CAR : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) पुणे शहरातील नेते वसंत मोरे (Vasant Moreहे मनसेत नाराज असल्याच्या बातम्या अधूनधून येत असतात. मनसेच्या अनेक कार्यक्रमांत मोरेंना डावलण्यात आले. मनसेने अनेकदा डावलल्याने वसंत मोरेंनी अनेकदा नाराजी व्यक्त केली. त्यामुळं गेल्या वर्षभरापासून मनसेत वसंत मोरे हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आजवर वसंत मोरेंना अनेक पक्षांकडून वेगवेगळ्या ऑफर आल्या. मात्र, आपण मनसेत राहणार अशी भूमिका वसंत मोरेंनी घेतली होती. दरम्यान, आता राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि वसंत मोरेंनी एकाच कारमधून सोबत प्रवास केला. त्यामुळं वसंत मोरे राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करतील, अशा चर्चांना उधान आलं आहे.

वसंत मोरे हे अनेकदा नाराज असल्याचं समोर आलं. त्यांची समजूत काढण्यासाठी मनसे अध्य राज ठाकरे आणि अमित ठाकरेंनीही वसंत मोरेंची भेट घेतली होती. त्यामुळं मोरेंची नाराजी संपली अशी चर्चा असतांनाचा वसंत मोरे यांनी काल सुप्रिया सुळे यांच्यासोबत एकाच कारमधून सोबत प्रवास केला. त्यामुळं मोरे हे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल या दोन्ही नेत्यांनी एकत्र प्रवास केला. त्यावेळी या दोन्ही नेत्यांनी पुण्यातील कात्रज चौकातील पुलाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाल्याची माहिती आहे. यामुळं राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना एकच उधाण आलं आहे. वसंत मोरे हे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशा चर्चांना बळ मिळाले आहे.

Maharashtra Politics : …तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात

कात्रज चौकातील पुलाच्या कामाची पाहणी केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी पत्रकारांशी संवाद साधला. वसंत मोरे आणि आमचा मागील 13 वर्षाचा प्रवास आहे. आम्ही समन्वयाने काम करतो, असं सूचक विधान सुप्रिया सुळेंनी केलंय.

वसंत मोरेंसोबत एकाच कारमधून प्रवास केल्याबद्दल सुप्रिया सुळेंना विचारलं असता त्यांनी सांगिलं की, मागच्या गेला 13 वर्षाचा हा प्रवास आहे. माझं म्हणणं असतं की, एकदा इलेक्शन झाली की, विकासाच्या कामात आमचे काही मतभेद नसतात. आम्ही अतिशय संजसणे काम करत असतो. गेल्या 13 वर्षात मला त्यांची मदतच झाली आहे, कदाचित माझाच त्यांना त्रास झाला असेल. याहून जास्त काही सांगू शकत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याची ओपन ऑफर दिली होती.

Exit mobile version