Maharashtra Politics : …तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात

Maharashtra Politics : …तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात

राज्यपालांचा निर्णय आक्षेपार्ह ठरवत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यास शिंदे-भाजप सरकार अडचणीत येऊ शकतं. अशावेळी अजित पवार भाजपसोबत गेल्यास ते मुख्यमंत्री होऊ शकतात, असं भाकीत सध्या राजकारणाच्या घडामोडींवर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केलंय. एका मुलाखतीदरम्यान, वागळे यांनी असं भाकीत केलं आहे.

विधवांना काय म्हणायचे? मंत्री लोढा यांनी सुचवले गंगा भगिरथी

राजकारणात काहीही शक्य होऊ शकतं, त्यामुळे कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. राज्यपालांचा निर्णय आक्षेपार्ह ठरवत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यास शिंदे-भाजप सरकार अडचणीत येऊ शकतं. अशावेळी अजित पवार भाजपसोबत गेल्यास ते मुख्यमंत्री होऊ शकणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

नाना पटोले म्हणाले, मविआच्या वाढत्या प्रभावानं विरोधक धास्तावले

जर अशी परिस्थिती निर्माण झाल्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तुम्ही भाजपसोबत जाऊ नका हे सांगणार नाहीत, तर संधी मिळाल्यास अजित पवार जातीलचं. सध्या अजित पवार विरोधी पक्षनेतेपदी असतानाही अस्वस्थ आहेत, त्यामुळे अजित पवार संधी का साधणार नाहीत? असा सवालही वागळेंनी यावेळी उपस्थित केला आहे.

उन्हाळ्यात थंड पाणी तुमच्यासाठी अपायकारक ठरू शकते, तुम्हाला या समस्यांचा सामना करावा लागेल

अजित पवारांचं भाजपसोबत जाण्याचं एक उदाहरण म्हणजे 2019 सालचा पहाटेचा शपथविधी आहे. कारण एरवी काकांच्या शब्दापुढे नसणारे अजित पवार पहाटेच भाजपसोबत शपथविधी घडवून आणतात, ही गोष्ट शरद पवारांना माहित नसेल का? असा सवाल उपस्थित करीत त्यांनी पवार कधीही भाजपसोबत जाऊ शकतात, असं म्हटलं आहे.

‘राष्ट्रवादी आमच्याबरोबर यायला एका पायावर तयार’ ; शिरसाटांच्या वक्तव्याने खळबळ !

जर पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांना माहित नसेल तर त्यांनी अजित पवारांवर शिस्तभंगाची कारवाई केली का? त्यावेळी काकांनी पुतण्यावर कारवाई केली नाही हे सत्य असल्याचंही सांगितलं आहे.

Sanjay Gaikwad : प्रभू रामाच्या जन्मावर आक्षेप घेणाऱ्या पक्षासोबत गेला आणि आम्हाला शहाणपणा शिकवता

दरम्यान, सध्या महाविकास आघाडीमध्ये धूसफुस सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अशातच सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालायाकडून राखून ठेवण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालायाच्या निकालानंतर भाजपसोबत गेल्यास अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube