Sanjay Gaikwad : प्रभू रामाच्या जन्मावर आक्षेप घेणाऱ्या पक्षासोबत गेला आणि आम्हाला शहाणपणा शिकवता

  • Written By: Published:
Sanjay Gaikwad : प्रभू रामाच्या जन्मावर आक्षेप घेणाऱ्या पक्षासोबत गेला आणि आम्हाला शहाणपणा शिकवता

ज्या काँग्रेस पक्षांनी प्रभू राम चंद्राच्या जन्मावरच आक्षेप घेतला होता, की प्रभू राम चंद्र हे अयोध्यात जन्मले याचा पुरावा काय आहे? तुम्ही त्यांच्यासोबत घरोबा करून राहिले असं प्रत्युत्तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना दिले आहे.

यावेळी आदित्य ठाकरे यांना उत्तर देताना गायकवाड म्हणाले की ज्यांना रामाचं अस्तित्वच मान्य नाही. भारतामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या रथ यात्रा निघाल्या, राम मंदिरासाठी आंदोलन झाली. त्यावेळेस देशात काँग्रेसच सरकार असताना त्या शरयू नदीच्या पात्रामध्ये लाखो साधू संताच्या लाशा पडल्या होत्या. अशा लोकांसोबत तुम्ही आघाडीमध्ये जाता, अशी टीका यावेळी गायकवाड यांनी केली.

State Co-operative Bank Scam : ईडीकडून आरोपपत्र दाखल, अजित पवारांसह पत्नीचं नाव नाही…

ते पुढे म्हणाले की रावणापेक्षा क्रूर काम या सरकारने केलं. अनेक साधू गोळीबारात मारले होते. एवढं पाप करणाऱ्या पक्षासोबत तुम्ही जाता आणि आम्हाला शहाणपणा शिकवता, असा सवाल त्यांनी यावेळी ठाकरे यांना विचारला. काँग्रेस पक्ष हे कधी प्रभू रामचंद्रांना मानत नव्हता, त्याच्यासोबत तुम्ही राहणारे कधीच रामराज्य आणू शकत नाही.

उध्दव ठाकरे यांना शेतीतल कळते का ?

आदित्य ठाकरेच्या वडिलांना म्हणजे उध्दव ठाकरे यांना शेती कळते का ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांचे पुत्र आहेत ते शेती करतात, याच्यामुळे अशा पोराला कोणावर टीका करायची याची अक्कल असली पाहिजे. आपले वय किती, आपण काय करतो, आपण शेतीत गेलो का? मुख्यमंत्री शेतीत काम करताना आम्ही पाहतो, कोणाबद्दल आपण बोलतो, हे कळले पाहिजे अशा शेलक्या शब्दांत आदित्य ठाकरेंवर गायकवाड यांनी टिका केली.

शंभूराज देसाईंची ठाकरेंवर खोचक टीका : म्हणाले, काका मला वाचवा…

तुम्ही तुमचे सांभाळून ठेवा.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना उत्तर देताना ते म्हणाले की, “संजय राऊत यांना सारखी स्वप्न फेब्रुवारीमध्ये सरकार पडणार, मार्चमध्ये सरकार पडणार, आमदाराचा गट फुटणार. संजय राऊत यांना काय गरज आहे आमच्याकडे बघायची. आम्ही एकदाच 50 जण बाहेर पडलो आणि सारखं 40-40 म्हणू नका. 50 जण आहोत. तुम्ही तुमचे सांभाळून ठेवा.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube