Download App

‘देवेंद्र फडणवीसांनी मिठाचा खडा टाकू नये’; पवारांवर टीका, अमोल कोल्हेंनी सुनावलं

Amol Kolhe On Devenra Fadnvis : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलाच वाद पेटल्याचं दिसून येत आहे. सत्ताधारी विरोधकांमध्येही वाकयुद्ध सुरु असल्याची परिस्थिती आहे. अशातच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी केलेल्या टीकेवरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी सडेतोडपणे प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारांनी काय केलंयं हे पाहण्यापेक्षा तुम्ही सर्व कसोट्यांवर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण कसं देता येईल? याकडं लक्ष देण्याची गरज असल्याचा सल्लाच अमोल कोल्हे यांनी दिला आहे.

‘निलंबनाची कारवाई चुकीची, मागे घ्या’; अधीर रंजन चौधरींचं लोकसभा सभापतींना पत्र

अमोल कोल्हे म्हणाले, देवेंद्र फडणवीस सध्या राज्यात जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचं काम करीत आहेत. राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे. त्यामुळे बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातिनिहाय जनगणना करुन सर्व कसोट्यांवर टिकणारं आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी करावेत, ना की अशी प्रक्षोभक विधाने करुन मिठाचा खडा टाकू नये, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

“काय सांगता येत भाऊ, उद्या तुम्हीही CM व्हालं” : मोदी-शाहांच्या ‘दे धक्का’ पॅटर्नने निष्ठावतांच्या आशा पल्लवित

तसेच राज्यात महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठीच वेगळं विधान करण्याच काम सुरु आहे. राज्यात मागील 55 वर्षे उद्योगधंदे, शेती व्यवसायात, शरद पवारांचं योगदान मिळालं आहे. शरद पवारांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळाल्याचं अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे फडणवीसांनी वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मराठा समाजाच्या मागणीकडे लक्ष दिलं तर बर होईल, असंही ते म्हणाले आहेत.

Animal Movie Marathi Seen : ‘अ‍ॅनिमल’चा ‘मराठी’ चेहरा; मराठमोळ्या कलाकारांची सिनेमात हवा !

दोन समाजात भांडणं लावण्याचा प्रकार सध्या राज्यात सुरु आहे. मात्र, 18 पगड जातींचा समाज एकत्रितपणे नांदण्याचा आपला महाराष्ट्र आहे. त्यामुळे जातनिहाय जनगणना होऊन आरक्षणाची मर्यादा वाढवू शकते, यासाठी केंद्र सरकारने आग्रही भूमिका घ्यायला हवी, राज्य सरकारनेही त्याचा पाठपुरावा करावा, असं न करता प्रक्षोभक विधाने टाळली पाहिजेत, असा सल्लाही कोल्हे यांनी यावेळी दिला आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
शरद पवार यांच्यामुळे मराठा आरक्षण लांबलं आहे. शरद पवार यांनी सर्वाधिक विरोध केल्यानेच मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही. शरद पवारांनी आतापर्यंत दोन समाजाला झुंजवत ठेवलं. ओबीसींना आरक्षणाची शिफारस करणाऱ्या मंडल आयोगाला त्यावेळच्या शिवसेनेने विरोध केला. त्यामुळेच भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले असल्याचं फडणवीस म्हणाले.

Tags

follow us