Download App

बाळासाहेब अन् शरद पवार नसते तर शाह सुटलेच नसते…; राऊतांचा मोठा दावा

खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामुळे अमित शाह (Amit Shah) तुरुंगात जाता जाता वाचले - खासदार संजय राऊत

Sanjay Raut : खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामुळे अमित शाह (Amit Shah) तुरुंगात जाता जाता वाचले असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत केला.

‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे ९९’ ला शुभेच्छा; राजकुमार हिरानी,आर. माधवन, शर्मन जोशी यांच्यासह रितेश देशमुखने शेअर केला ट्रेलर 

संजय राऊत यांनी लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केलं. या मुलाखतीत राऊतांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी अमित शाहा यांना कशी मदत केली? याचा उल्लेख केला. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ह्या महाराष्ट्राच्या दोन मोठ्या शक्ती आहेत. बाळासाहेब नसते तर अमित शाह सुटलेच नसते. शरद पवार नसते तर अमित शाह दिसलेच नसते. शाह यांच्यावर महाराष्ट्राचे अनेक उपकार आहेत. नरेंद्र मोदींनी शरद पवारांना फोन करून सांगितलं होतं की, अमित शाह माझ्या जवळचे आहेत. कामाचा माणूस आहे. काहीही करा, पण त्यांना वाचवा, असं असं मोदींना पवारांना सांगितलं होतं, असं राऊत म्हणाले. आता शाह हे सगळं विसरले. ते व्यापारी आहे. व्यापारी कधीही कृतज्ञ नसतो, असा टोलाही राऊतांनी लगावला.

हृतिक रोशन एनटीआर साठी ‘वॉर 2’ सोबत आणणार धमाकेदार बर्थडे सरप्राइझ! 

एका महिलला शिविगाळ केल्याची राऊतांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. याविषयी विचारलं असता ते म्हणाले की, याबाबत मला काहीही माहिती नाही. असं काहीच झालेलं नाही. मी असल्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, असं राऊत म्हणाले.

फडणवीस लोकनेते नाहीत…
फडणवीसांविषयी बोलताना ते म्हणाले, फडणवीसांचा माझ्यावर राग असण्याच कारणं नाही. मलाही त्यांच्यावर राग नाही. सत्ता आहेत म्हणून हे आहेत. सत्ता गेली तर फडणवीस काहीच नाहीत. फडणवीस, मोदी, शाह हे काही लोकनेते नाहीत. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते. विधानसभेला त्यांच्या 133 जागा कशा निवडून आल्या हे सर्वांना माहिती आहे. 133 जागा महायुतीला, शरद पवारांना फक्त 10, अन् ठाकरे गटाला 20 जागा हे वास्तव कोणी मान्य करतंय का? 65 लाख मतदान पुढच्या दोन तासात कसं वाढले, याचा निवडणूक आयोग तयारच नाही. मतदानाचं व्हिडिओ चित्रण मिळू नये, म्हणून त्यांनी कायदा बदलला, इतके हे घाबरले, असा टोला राऊतांनी लगावला.

follow us