Download App

देवेंद्रंना राऊत नावाची चीड; डरपोक म्हणत राऊतांनी बाहेर काढली फडणवीसांची राजकीय कुंडली…

माझं नाव जरी घेतलं तरी फडणवीस चिडतात. चिडायलाच पाहिजे. कारण, मी सत्य बोलतो. सत्य ऐकून घ्यायची त्यांची क्षमताच नाहीत.

Sanjay Raut : सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत असतात. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांन (Sanjay Raut) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांव (Devendra Fadnavis) जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस हे काही महात्मा नाहीत. ते लोकनेते नाहीत. त्यांच्यात सत्य ऐकून घ्यायची क्षमताच नाहीत. त्यांना फक्त आपला उदोउदो हवा असतो, अशी टीका राऊतांनी केली.

‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे ९९’ ला शुभेच्छा; राजकुमार हिरानी,आर. माधवन, शर्मन जोशी यांच्यासह रितेश देशमुखने शेअर केला ट्रेलर 

संजय राऊत यांनी लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केलं. राऊत म्हणाले, फडणवीसांचा माझ्यावर राग असण्याच कारणं नाही. मलाही त्यांच्यावर राग नाही. सत्ता आहे म्हणून ते आहेत. सत्ता गेली तर फडणवीस काहीच नाहीत. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते. फडणवीस, मोदी, शाह हे काही लोकनेते नाहीत, अशी टीका राऊतांनी केली.

65 लाख मतदान कसं वाढले?
विधानसभेला महायुतीच्या 133 जागा कशा निवडून आल्या हे सर्वांना माहिती आहे. 133 जागा महायुतीला, शरद पवारांना फक्त 10, अन् ठाकरे गटाला 20 जागा हे वास्तव कोणी मान्य करतंय का? 65 लाख मतदान पुढच्य दोन तासात कसं वाढले, याचा उत्तर निवडून आयोग द्यायला तयारच नाही. आम्हाला व्हिडिओ चित्रण मिळू नये, म्हणून कायदा बदलला, इतके महायुतीवाले घाबरले, अशी टीकाही राऊतांनी केली.

फडणवीसांनी अनिल देशमुख मला अटक करणार होते, असा दावा केला होता. यावरही राऊतांनी भाष्य केलं. ते म्हणाले, मला तसं वाटत नाही, पण गिरीश महाजन हे काही संत तुकाराम किंवा संत एकनाथ नाहीत. तुम्ही जे काही भ्रष्टाचार, घोटाळे केले, फोन टॅप केले, परदेशातून पेगासस आणलं, हे सगळे मोठे गुन्हे आहेत. याचे पुरावे आहेत. तुमच्या गुन्हाविषयी साधा एफआरआयही दाखल करायचा नाही, तुम्ही असे कोण कोण लागून गेला? असा सवाल राऊतांनी केला. त्या रशमी शुक्ला आमदाराना धमक्या देत होत्या. हे सगळं रेकॉर्डवर आहे. फडणवीस हेही काही महात्मा नाहीत. ते डरपोक आहेत. त्यांचा फोन टॅपिंगशी तुमचा संबंध नसेल तर चे निरापराध सिध्द झाले असते. पण, त्यांच्यात लढण्याची हिंमत नाही. ते डरपोक आहेत, अशी टीका राऊतांनी केली.

माझं नाव जरी घेतलं तरी फडणवीस चिडतात. चिडायलाच पाहिजे. कारण, मी सत्य बोलतो. सत्य ऐकून घ्यायची त्यांची क्षमताच नाहीत. त्यांना फक्त आपला उदोउदो हवा असतो, असा टोलाही राऊतांनी लगावला.

follow us