MP Supriya Sule Criticized Sunil Tingre : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पुण्यातील आमदार सुनील टिंगरे गेल्या काही म्हणण्यापूर्वी पोर्श कार अपघात प्रकरणामुळे चर्चेत होते.आता त्यांनी या प्रकरणातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नोटीस पाठवली आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी माध्यमांसमोर सुनील टिंगरे यांनी पाठवलेली नोटीस दाखवत महायुती सरकारवर टीका केलीय.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी शरद पवारांना नोटीस पाठवली आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या अध्यक्षांना नोटीस पाठवण्यात आलीय. पोलिसांच्या माहितीनुसार आम्ही भाष्य केलंय. हे बोलणं या देशात गुन्हा असेल, तर तो मला मान्य आहे. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, या नोटीसमध्ये शरद पवार यांचं नाव आहे. त्यांच्या नावानीच ही नोटीस पाठवलेली आहे. यामध्ये पोर्श कार अपघात प्रकरणात बिनशर्त माफी मागण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालया प्रश्न मार्गी लागला; राणाजगजितसिंह पाटील यांची प्रचार दौऱ्यात माहिती
राजकारणात सध्या सत्तेत असलेल्या लोकांकडून धमक्या दिल्या जात आहेत, असं म्हणत धनजंय महाडिक यांच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध व्यक्त केलाय. भाजप स्वत:च्या खिशातून पैसे देत नाही. महिला आयोगाने याची दखल घ्यावी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. राज्यात असे वक्तव्य करण्याची हिंमत होतेच कशी? असा सवाल त्यांनी केलाय. महाराष्ट्र राज्यातील महिला हे खपवून घेणार नाही, असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ रावसाहेब दानवे मैदानात; वांबोरीत घेतली भव्य सभा, म्हणाले…
अजित पवार यांच्या चौकशी फाईलवर देवेंद्र फडणवीस यांनी सही केली. अजित दादांच्या बहिणीच्या घरावर छापे कशाच्या आधारे, असा सवाल त्यांनी केलाय. अजित पवारांवरील आरोप खरे की खोटे याचे उत्तर फडणवीस यांनी द्यावे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. सत्तेत मला आणि अजित पवार यांना किती पदे मिळाली ते शोधावे, असं सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांच्या टिकेला उत्तर दिलंय.