अडीच लाख मतांनी पराभूत करेन’ ; विनायक राऊत यांचं नारायण राणे यांना जाहीर आव्हान

सिंधुदुर्ग : महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे- फडणवीस सरकार आल्यापासून ठाकरे गट आणि राणे कुटुंबीयांकडून एकमेकांवर जोरदार टीका केला जात आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि राणे पितापुत्रांकडून आरोप प्रत्यारोप होत असल्याचा दिसून येत आहे. काही दिवसाअगोदर ठाकरे गटाच्या राजन साळवी (Rajan Salvi) या नेत्यानेही नारायण राणे (Narayan Rane) यांनी कोकणातून लोकसभेसाठी उभा […]

मुलाच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राणे सज्ज; ठाकरेंच्या राऊतांचंही कडवं आव्हान

मुलाच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राणे सज्ज; ठाकरेंच्या राऊतांचंही कडवं आव्हान

सिंधुदुर्ग : महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे- फडणवीस सरकार आल्यापासून ठाकरे गट आणि राणे कुटुंबीयांकडून एकमेकांवर जोरदार टीका केला जात आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि राणे पितापुत्रांकडून आरोप प्रत्यारोप होत असल्याचा दिसून येत आहे. काही दिवसाअगोदर ठाकरे गटाच्या राजन साळवी (Rajan Salvi) या नेत्यानेही नारायण राणे (Narayan Rane) यांनी कोकणातून लोकसभेसाठी उभा राहून दाखवावे असं जाहीर आव्हान दिले होते.

यानंतर आता पुन्हा एकदा खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्याकडून त्यांना आव्हान देण्यात आल्याने राणे- ठाकरे गट वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे जर माझ्या विरोधात निवडणुकीला उभे राहिले तर त्यांचा अडीच लाख मतांनी पराभव करणार असा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला.

यावेळी विनायक राऊत यांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सिव्होटर्सचा सर्व्हे नेहमी सत्य असतो, असे म्हणून त्यांनी नरेंद्र मोदींच्या राजवटीला जनता कंटाळली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

एकनाथ शिंदे यांचे सरकार बिनकामाचे आणि भाजपच त्यांचे विसर्जन करणार असा टोला देखील विनायक राऊत यांनी लगावला. नारायण राणे यांच्यावर निशाणा साधताना विनायक राऊत यांनी राणे यांच्या जवळच्या माणसाने तरुणींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत नारायणे राणे यांचा मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे.

संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वादाविषयी बोलताना ते म्हणाले की, संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयम पाळण्याची आवश्यकता असल्याचे ही विनायक राऊत म्हणाले. खासदार विनायक राऊत यांनी जोरदार टीका केली असल्याने पुढील आगामी काळात राणे आणि राऊत यांच्या वाद विकोपाला जाण्याची शक्यता असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

Exit mobile version