‘हिंमत असेल तर विद्यार्थ्यांच्या केसाला हात लावून दाखवा’; रोहित पवारांचा सरकारला इशारा

Rohit Pawar On MPSC Protest; विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय इथून हलणार नाही, असा निर्धार रोहित पवारांसह विद्यार्थ्यांनीही केला आहे.

Rohit Pawar On MPSC Protest

Rohit Pawar On MPSC Protest

Rohit Pawar On MPSC Protest: मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला कडक शब्दात सुनावल्यानंतरही पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी आमदार रोहित पवार अजुनही मैदानात आहेत. कोणत्याही परिस्थीतीत आम्ही MPSC आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय इथून हलणार नाही, असा निर्धार रोहित पवारांसह विद्यार्थ्यांनीही केला आहे.

नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांचा हल्लाबोल

उच्च न्यायालय काय म्हणाले

मुंबई उच्च न्यायालयाने MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले. “विद्यार्थी काही समाजविघातक नाहीत. आंदोलन करणं हा त्यांचा हक्क आहे,” असं स्पष्ट करत न्यायालयाने विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी सरकारने प्रामाणिक प्रयत्न करावेत, असं सांगितलं. पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा मुख्य उद्देश शिक्षण घेणं आहे, आंदोलन करणं नाही, प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य आणि समान संधी मिळाली पाहिजे, असे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

12 तासांत चार पत्रकार परिषदा अन् दोन मंत्र्यांचे गंभीर आरोप; राहुल गांधींना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने लावली ताकद

रोहित पवार काय म्हणाले

विवेक भीमनवार यांनी राजीनामा दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “आम्हाला इथून हलवून दाखवा. हिंमत असेल तर विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावून दाखवा,” असं आव्हानही त्यांनी सरकारला दिलं.

…पण मी दादांसारखी नाही! सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना थेट इशारा

आंदोलनासाठी 2 ऑक्टोबरला परवानगी मिळाल्याचा दावा करत, “हेच पत्र गृहित धरून सरकारने निर्णय घ्यावा. आम्ही इथून हलणार नाही,” अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली. सरकारकडे आता दोन पर्याय आहेत. एक म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मित्र विवेक भीमनवारांना घरी पाठवणं आणि दुसरा पर्याय पोलिसांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर अन्याय करणं. मात्र, विद्यार्थ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Exit mobile version