एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार झुकलं; मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीत 8 मोठे निर्णय

MPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांची बैठक; अध्यक्षांच्या चौकशीपासुन ऑफलाईन परीक्षांपर्यंत 8 मोठे निर्णय.

News Photo   2026 09 30T205911.525

MPSC Students Meet With CM Fadnavis

MPSC Students Meet With CM Fadnavis : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत (CM) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन बैठकीनंतर काही महत्त्वाचे निर्णय आणि आश्वासनं समोर आली आहेत. एमपीएससी अध्यक्षांपासुन परीक्षा पद्धती, रिक्त पदांची भरती आणि विद्यार्थ्यांसाठी सिंगल कार्ड व्यवस्थेपर्यंत विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली.

मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा पद्धतीत बदल; आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

1) एमपीएससी अध्यक्षांबाबत न्यायालयीन चौकशी
एमपीएससी अध्यक्ष हे संवैधानिक पद असल्यामुळं राज्य सरकार किंवा राज्यपालांना त्यांना थेट हटवण्याचा अधिकार नाही. संविधानाच्या कलम 317 नुसार एमपीएससीचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसेच सदस्य यांच्याबाबत कारवाई करण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती. याबाबत 3 महिन्यांत न्यायालयीन चौकशी करण्यात येणार असुन चौकशीच्या निष्कर्षाच्या आधारावर पुढील कारवाई केली जाणार आहे.

2) एमपीएससी सचिवांची बदली
एमपीएससी सचिवांची बदली तत्काळ करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं आहे.

3) एमपीएससीच्या परीक्षा ऑफलाईनच
एमपीएससीच्या यापुढील परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्व घटकांशी चर्चा केल्याशिवाय परीक्षा पद्धतीत कोणताही वेगळा निर्णय घेतला जाणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

4) विक्रमी संख्येनं रिक्त पदांची भरती
राज्य सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदं असुन यापुढे आजवरचे सर्व विक्रम मोडतील इतक्या जागा भरण्याची तयारी सुरू असल्याचं सांगण्यात आलं. 1960 पासुन भरती नियमांमध्ये मोठ्या सुधारणा झाल्या नव्हत्या. त्यामुळं अनेक विभागांमध्ये 30 ते 40 टक्के जागाच भरण्याची परवानगी होती. आता 60 टक्के विभागांचे सुधारित नियम तयार झाले असुन उर्वरित विभागांचे नियमही तयार करण्याचं काम सुरू आहे. 3 जानेवारीच्या गट क परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जागावाढीची विद्यार्थ्यांची मागणी मान्य करण्यात आली असुन गट क मध्ये विक्रमी जागा वाढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

5) विद्यार्थ्यांसाठी सिंगल कार्डची व्यवस्था
एमपीएससीच्या सर्व परीक्षा एकाच सिंगल कार्डच्या माध्यमातुन देता याव्यात, यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे. हे कार्ड विद्यार्थ्यांना माफक दरात उपलब्ध करुन देण्यात येणार असुन परीक्षा अर्जासाठी वारंवार कागदपत्रं सादर करण्याची गरज पडणार नाही, अशी व्यवस्था विकसित केली जाणार आहे.

6) 3 वर्षांच्या जागा एकाच वेळी जाहीर करणार
यापुढे 3 वर्षांच्या रिक्त पदांची माहिती एकाच वेळी जाहीर करण्याची तयारी करण्यात येणार आहे. तसंच ज्या जागांवर कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत, त्या पदांसाठी 1 वर्ष आधीच भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येनं रिक्त पदं भरण्याचं नियोजन असुन पुढील 1 महिन्यात त्याचा संपूर्ण कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे.

7) 2 ऑक्टोबरचं आंदोलन तात्पुरतं स्थगित
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर विद्यार्थ्यांनी 2 ऑक्टोबर रोजी प्रस्तावित केलेलं आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्याची घोषणा केली आहे. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर सरकारकडुन देण्यात आलेल्या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Exit mobile version