Uddhav Thackeray : महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत आली होती. तेव्हा मी मुख्यमंत्री असताना फक्त महाराष्ट्रावरच नाही जगावर कोरोनाचे संकट आले होते. पण, तेव्हा माझ्यावर टीका करायचे नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकार पाडून आलेले शिंदे फडणवीस यांचे सरकार आल्यापासून राज्यावर संकटेच संकटे येत आहेत. त्यामुळे हे उलट्या पायाचे सरकार राज्यात आले, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.
नागपूर येथे महाविकास आघाडीची ‘वज्रमुठ’ सभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते. याप्रसंगी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, सुनील केदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. जितेंद्र आव्हाड, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अंबादास दानवे उपस्थित होते.
शिंदे जाणार … अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या तयारीत? – Letsupp
उद्धव ठाकरे म्हणाले की, देशातील गल्लीबोळात घराणेशाहीच्या नावाने गळा काढणाऱ्यांना आज एका कर्तृत्ववान घराण्याचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करावा लागला. हे विसरता येणार नाही. महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूर येथे आपण शेतकरी कर्जमुक्तीचे घोषणा केली होती. ती आपण सत्तेत आल्यावर लगेच पूर्ण केली आहे.
भारतमातेच्या पायात बेड्या घालण्याचे काम सध्या देशात सुरू आहे. पण, देशाची घटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आपण वाचवण्यासाठी पुढे येऊन लढले पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी नागपूरकरांना केले.