शिंदे जाणार … अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या तयारीत?

शिंदे जाणार … अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या तयारीत?

Ajit Pawar Become Chief Minister : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या पक्षांतर बंदीच्या निकालाची टांगती तलवार आहे. त्यामुळे शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरण्याची शक्यता असल्याने भाजपबरोबरच्या सत्तेतून एकनाथ शिंदे हे बाहेर पडतील. परंतु, त्यांची जागा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे भाजपसोबत युती करून त्यांचा उत्तराधिकारी होण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न साकार करण्याची खूपच घाई झाली आहे, असे देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यांना राष्ट्रवादीच्या ३५-४० आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे पक्षांतर विरोधी कायदा लागू होणार नाही, असे देखील बोलले जात आहे.

पक्षाचे नाव आणि चिन्ह गमावले असले तरी उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य यांची लोकप्रियता वाढली आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार, राज्यातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी महाविकास आघाडीला ३३ जागा मिळतील. भाजपला महाराष्ट्र गमावणे परवडणारे नाही, असे सूत्राने सांगितले. भाजपची स्थिती अत्यंत कठीण असून भाजपला मुख्यमंत्री म्हणून मराठा चेहरा हवा आहे. मराठा समाजाचे ३५ टक्के मतदार आहेत, त्यामुळे अजित पवार यांना खेचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.

परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच अध्यक्ष शरद पवार हे भाजपसोबत जाण्यास तयार नाहीत. मात्र, पक्षातील वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे की यासाठी शरद पवार यांची संमती मिळावी, जेणेकरून २०१९ मध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा फसवणूक टाळता येईल. जे ८० तासांच्या आत सरकार पडले आहे. 

अजित पवार हे राष्ट्रवादीत अस्वस्थ, त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत यावं; आठवलेंनंतर आता शिवतारेंचं निमंत्रण – Letsupp

अजित पवार यांच्या समर्थकांना याची जाणीव आहे की शरद पवारांच्या जनभावना बदलण्याच्या क्षमतेमुळे पक्षाच्या  विरोधात जाणे म्हणजे राजकीय आत्महत्या असू शकते,” असे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या याच आमदारांनी शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवार यांच्यावर दबाव आणल्याचे बोलले जात आहे.

अजित पवार जेव्हा ८ एप्रिलला संपर्कात नव्हते. नेमके त्याच दिवशी भाजप नेते अमित शहा यांना भेटून अंतिम करार करण्यासाठी दिल्लीला चार्टर्ड फ्लाइटने अजित पवार गेले असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे खातेवाटपाचा निर्णय घेण्यासाठी त्यांच्यासोबत होते, असे देखील सूत्राने सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube