अजित पवार हे राष्ट्रवादीत अस्वस्थ, त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत यावं; आठवलेंनंतर आता शिवतारेंचं निमंत्रण
Ajit Pawar should join Eknath Shinde’s Shiv Sena : काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी ट्विट करत राज्याच्या राजकारणात एक खळबळ उडवून दिली. 15-16 आमदार लवकरच बाद होणार असून ते बाद झाल्यावर अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत भाजपसोबत जाणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यामुळं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी अजित पवार हे आमच्या पक्षात आलेतर मला आनंदच होईल, असं विधान केलं होतं. दरम्यान, आता आता शिवसेना (शिंदे गटाचे) प्रवक्ते आणि माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजिव पवार हे राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यचा शिवसेनेत यावं, असं खुल आवाहन दिलं आहे.
इंदापूर येथे पत्रकारांशी संवाद असतांना विजय शिवतारे म्हणाले की, अजित पवार हे राष्ट्रवादीत अस्थस्थ आहेत, हे नक्की. त्यामुळं त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत यावे. अजित पवार हे आज अस्वस्थ आहेत, असं नाही. तर फडणवीसांसोबत याच अवस्थेतेतूनच ते पहाटेच्या शपथविधीला गेले होते. हे महाराष्ट्रालाच नाही, तर अख्या देशाला माहित आहे. अजित पवार हे थोतांड माणूस नाही की, कुणीतरी सांगितलं म्हणून ते गेले आणि नंतर परत आले. यावर माझा अजिबात विश्वास बसत नाही. कारण, राष्ट्रवादीत अजित पवारच फक्त काम करणार माणूस आहे. बाकी सगळी लुटारूंची टोळी आहे. राष्ट्रवादीत जे चालले होते, ते ठीक नव्हते, म्हणून ते भाजपकडे गेले असं शिवतारे म्हणाले.
शिवतारे म्हणाले की, भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. तर शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे. ते इकडे आले तर चांगल्या पध्दतीचे वातावरण होईल. पण, तो अजित पवार यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. राजकारणात कधी कधी वावड्या उठवल्या जातात. मात्र, अजित पवार हे भाजपमध्ये येणार, हे कोणाला नाही आवडणार, असं सांगत शिवतारे यांनी अजित पवार यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत यावे, असं खुलं निमंत्रण दिल आहे. ते म्हणाले की, अजित पवार हे चुकीच्या पक्षात आहेत. त्यांनी पक्ष सोडायची मी वाट पाहात असल्याचं सांगितलं.
पंतप्रधान मोदींच्या विरोधात अतिक अहमदने जेलमधून लढवली होती निवडणूक…!
दरम्यान, अजित पवार हे भाजपसोबत आले, तर पुरंदरला तुमचा विजय सोपा होईल का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, शिवतारे म्हणाले की, पुरंदरच काय संपूर्ण महाराष्ट्रात सोपे होईल. माझा पुरंदरमधील पराभव हा अपघात आहे. आम्ही पुरंदरमध्ये प्रचंड विकासकामे केली आहे, असं त्यांनी सांगिलतं.
आठवले काय म्हणाले होते ?
अजित पवार हे माझ्या पक्षात आले तर मला आनंदच होईल. ते माझ्या पक्षात आले तर त्यांना मंत्रीपद देण्याचा नक्की विचार करेन. माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार नाही, कारण आमचे आमदार नाहीत. पण, राजकारणात काहीही होऊ शकतं. त्यामुळं आम्हाला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर आम्ही अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी देऊ, असं आश्वासन आठवले यांनी दिलं.
राजकारणात कधी काय घडेले, हे सांगता येत नाही. राजकीय नेत्याच्या बदलत्या भूमिकेमुळं रात्रीतून सत्तांतर झाल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारण अनेक घडामोडी घडल्या. आता राष्ट्रवादीत अजित आणि खासदार सुप्रीया सुळे यांच्यात नेतृत्वासाठीचा छुपा संघर्ष असल्याचं बोलल्या जातं. अजित पवार हे खरोखरच राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत का, आणि ते अस्वस्थ असल्यास काय निर्णय घेतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.