पंतप्रधान मोदींच्या विरोधात अतिक अहमदने जेलमधून लढवली होती निवडणूक…!
Ateeq Ahmad Vs Narendra Modi : लँड क्रूजर, मर्शिडीज अशा ८ कोटींपेक्षा अधिक किमतीच्या गाड्यामधून उत्तर प्रदेश येथील कुख्यात गँगस्टर अतिक अहमद फिरत असे. याच अतिक अहमदने जेलमधूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सन २०१९ ची वाराणसी लोकसभा निवडणूक लढवली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात त्या निवडणुकीत अतिक अहमदला ८३३ मतं मिळाली होती. प्रयगराज येथील नैनी सेंट्रल जेलमधूनच अतिक अहमदने पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात आपला अर्ज भरला होता.
Atiq Ahmed Murder Case : अतिक अहमद होता तरी कोण? – Letsupp
कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान घडली होती. अतिक आणि अशरफ यांना प्रयागराज येथील रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले असून तिथे त्यांचे पोस्टमार्टेम करण्यात येत आहे. हल्लेखोरांनी गोळीबार केला तेव्हा प्रसारमाध्यमांनी दोघांची चौकशी केली. अतिक अहमद यांच्या डोक्यात गोळी लागली. हल्लेखोर हे मीडियावाले म्हणून आले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
उत्तर प्रदेश मध्ये अतिक अहमद यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याने तो २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रयगराज येथील जेलमध्ये होता. परंतु, जेलमध्ये असतानाच त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत अतिकला अवघी ८३३ मते मिळाली होती.