Nitesh Karale News : तुम्हारे जित से जादा हमारे हार की चर्चा है, नागपूर पदवीधरमध्ये आपणच किंगमेकर ठरलो असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार नितेश कराळे मास्तरांनी (Nitesh Karale) दिलीयं. नागपूर पदवीधर मतदारसंघात रात्री उशिराने मोठा उलटफेर पाहायला मिळालां. कॉंग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी भाजपच्या सुधाकर कोहळेंना मागे टाकत आघाडी घेतली आणि विजय मिळवला. नितेश कराळे मास्तरांना मिळालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मतांच्या आधारे निकाल ठरला असल्याचं नितेश कराळेंनी म्हटलंय.
पुढे बोलताना कराळे मास्तर म्हणाले, आपल्याला 25 हजार तरुणांनी मतदान केलं. आपल्याला मिळालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मतांच्या आधारे आता निकाल ठरला आहे. असे ते म्हणाले. आपले मत निर्णायक ठरले. आपण उभे राहिलो नसतो तर निवडणुकीची रंगत वाढली नसती. आपण ज्या विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी लढलो, त्यांच्यासाठी विरोधकांनी काय केले असा सवालही कराळे मास्तरांनी विचारला. शाळा आणि संस्था उभ्या करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली. हे लोक एकही मुद्दा मांडत नाहीत, तरीही पक्ष त्यांना तिकीट देतात. आपल्याला जर पक्षाने तिकीट दिलं असतं तर आज रात्री डीजे वाजवत घरी आलो असतो, असं कराळेंनी स्पष्ट केलंय.
तसेच आमच्या बॅलेट पेपरवर अभिजीत वंजारीना जास्तीत जास्त मतदान होतं. अभिजीत वंजारींनी स्वतः श्रेय घेऊ नये. मी मत मागताना प्रत्येक वेळेस लोकांना ही निवडणूक दोन नंबर वर जाणार असल्याचे सांगितले, मला एक नंबरचा मत दिल्यानंतर दोन नंबरचा मत तुमच्या आवडीच्या व्यक्तीला द्या. बीजेपी विरोधात लोकांचा रोष असल्यामुळे दोन नंबरचा मत अभिजीत वंजारी यांना दिलं. बीजेपीने दोन नंबरचा मत मागितले नाही हे त्यांच्यासाठी घातक ठरलं. त्यांनी दोन नंबर मागितलं असतं तर माझ्या बॅलेट वर सारखेच दोन नंबर त्यांना असते आणि बीजेपी ची सीट देखील येथे निवडून येऊ शकली असते. हा निकाल नवीन अध्याय घेऊन महाराष्ट्रात आला आहे. तुम्ही जर एखाद्या काम करणाऱ्याची सीट डावलत असाल तर लोक त्याला आपल्या मतदानातून प्रत्युत्तर देईल, असंही कराळेंनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, नितेश कराळे यांनी पदवीधर मतदारसंघात 25 हजार मतं मिळवले. ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याच दुसऱ्या पसंतीच्या मताच्या आधारे नागपूर पदवीधरमध्ये अभिजीत वंजारींचा विजय सोपा झाला. या मतदारसंघात जर आपल्याला पक्षाने अधिकृत तिकीट दिलं असतं तर चित्र वेगळं असतं असे नितेश कराळेंनी म्हटलंय.
