Uddhav Thackeray : नरेंद्र मोदी सरकार येण्यापूर्वी देशात गॅस सिलिंडर, पेट्रोलचे भाव किती होते. आता किती झाले आहे. महागाई परमोच्च शिखरावर पोहोचली आहे. पण, त्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी लोकांना धार्मिक बनवले जात आहे. केंद्र सरकारला त्यांच्याच पक्षातील नेते आणि राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीच घरचा आहेर दिला आहे. आता काय बोलणार आहे, देशातील जनतेला काय उत्तर देणार आहे, अशी सडकून टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर करत उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये हल्लाबोल केला.
नागपूर येथे महाविकास आघाडीची ‘वज्रमुठ’ सभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते. याप्रसंगी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. जितेंद्र आव्हाड, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अंबादास दानवे उपस्थित होते.
Uddhav Thackeray : शिंदे-फडणवीस सरकार उलट्या पायाचे… – Letsupp
हिंडेनबर्ग अहवालामुळे देशातील एका खोट्या उद्योगपतीचा बुरखा फाटला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे त्याला वाचवत आहे. हिंडेंनबर्ग परदेशी आहे त्याच्यावर काय विश्वास ठेवायचा असे मोदी-शाह सांगत आहे. पण, सत्यपाल मलिक हे तुमचेच कार्यकर्ते आहेत. राज्यपाल आहेत. मग, मलिक यांनी पुलवामाबाबत केलेल्या आरोपांवर तरी तोंड उचकटा, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाह यांच्यावर केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात बाप चोरणाऱ्या औलादीना घेऊन सरकार स्थापन करणारे भाजप हे इतरांना नैतिकतेचे डोस पाजत आहे. परंतु, स्वतःचे सगळी कृत्य मात्र रावणाची करत आहे. या फडतूस, नेभळट आणि कर्तृत्वहीन भाजप-शिंदे सरकार घरी पाठवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.