Download App

‘महापालिका निवडणुकांबाबत मविआत कोणतीही…’; शरद पवारांच्या भेटीनंतर पटोलेंचं मोठं विधान

सैफ अलीवर हल्ला करणारा आणि आता पोलिसांनी पकडलेला आरोपी यात फरक आहे. दैनिक भास्करने तसे वृत्त प्रकाशित केलं.

  • Written By: Last Updated:

Nana Patole : पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local government elections) जाहीर होण्याची शक्यताा आहे. या निवडणुकाच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी सुरुवात झाली आहे. मात्र काही पक्षांकडून या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी चाचपणी सुरू असल्याची देखील चर्चा आहे. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाष्य केलं.

छावा: अतुलनीय शौर्य आणि दृढनिश्चयाचे दर्शन, सिनेमा ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित 

नाना पटोलेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केल. स्थानिक स्वराज्य निवडणुकांविषयी बोलताना ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लागतील की नाही याबाबत सर्वांच्याच मनात शंका आहेत. गेल्या साडेतीन वर्षापासून भाजप आणि त्यांच्या युतीने स्थानिक स्वराज्य संस्थाचंया निडवणुका न होऊ देणं याचा अर्थ लोकल बॉडी लोकशाही संपवण्याचा त्यांचा डाव आहे, अशी टीका पटोलेंनी केली. तसेच निवडणुका अद्याप लागलेल्या नाहीत. त्यामुळे निवडणूकांबाबत मविआत कोणत्याही चर्चा सध्या नाही, असंही ते म्हणाले.

सैफ अली खानला बघितल्यावर मलाच संशय आला, खरंच चाकू मारली की अॅक्टिंग होती, अशी शंका मंत्री नितेश राणेंनी व्यक्त केली. यावरही पटोलेंनी भाष्य केलं. ते म्हणाले, धर्म आणि राजकारण हा भाजपचा अजेंडा आहे. जनतेचे मुळ प्रश्न बाजूला सारून धार्मिक तेढ निर्माण करणं हीच भाजपची भूमिका आहे. सैफ अलीवर हल्ला करणारा आणि आता पोलिसांनी पकडलेला आरोपी यात फरक आहे. दैनिक भास्करने तसे वृत्त प्रकाशित केलं. त्यामुळं पकडलेला आरोपी खरा आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय. सरकार असली गुन्हेगाराला पकडण्याऐवजी धार्मिक तेढ निर्माण करतेय, असं म्हणत सैफ अली खान हल्ला प्रकणातील वस्तुस्थिती समोर यावी, अशी मागणी त्यांनी केली.

वाल्मिक कराडने बीडवरून पुण्याला कसा पळ काढला? तीन आलिशान गाड्यांचे CCTV फुटेज समोर… 

सैफ अली खानवरील हल्ल्याला धर्माच्या दृष्टीकोनातून पाहू नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जाती धर्माच्या भेदभावाला थारा नाही, असं पटोले म्हणाले. तसेच मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत, अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेचं काय होणार? असा सवाल पटोलेंनी केला.

 

follow us