Download App

मोदींच्या कार्यकाळात प्रवाशांचा जीव स्वस्त, कवच योजना केवळ जुमलेबाजी; रेल्वे अपघातावरून कॉंग्रेसची टीका

पूर्वी रेल्वेचे तिकिटं स्वस्त होती, पण सध्या प्रवाशांचा जीव स्वस्त झालाय, मोदींनी आणलेली कवच योजना ही निव्वळ जुमलेबाजी आहे - नाना पटोले

  • Written By: Last Updated:

Nana Patole on Jalgaon Express Accident : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुका येथील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात घडला आहे. पुष्पक एक्सप्रेसला (Pushpak Express) आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांनी धावत्या गाडीतून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी दुसऱ्या बाजूने वेगात येत असलेल्या बंगळुरू एक्सप्रेसने (Bangalore Express) ११ प्रवाशांना चिरडल्यावे वृत्त आहे. या अपघातावर बोलतांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर, CM फडणवीसांची मोठी घोषणा 

पूर्वी रेल्वेचे तिकिटं स्वस्त होती, पण सध्या प्रवाशांचा जीव स्वस्त झालाय, मोदींनी आणलेली कवच योजना ही निव्वळ जुमलेबाजी आहे, अशी टीका पटोलेंनी केली.

नाना पटोले म्हणाले की, प्रवासी रेल्वेचा अशा प्रकारे अपघात होणं दुर्दैवी आहे. आता अपघातातील जखमींची आकडेवारी समोर येत आहे. या अपघातात २५-३० प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं. अलिकडच्या काळात रेल्वे अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातांमध्ये वाढ झाली, अशी टीका पटोलेंनी केली.

कवच योजना केवळ जुमलेबाजी…
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातांमध्ये वाढ झाली आहे. यात निर्दोष लोकांची जीव जात आहे. पंतप्रधान मोदी यांचे सरकार योजना आणण्याच्या घोषणा करतात. कोणाची जीव जाणार नाही, असे दावे करतात. सरकारने कवच नावाची योजना आणलेली आहे. लोकांना वाटते की नरेंद्र मोदींनी आपल्याला कवच दिलं. त्यामुळे कुठल्याही दुर्घटनाग्रस्त आणि निर्दोष लोकांचा जीव जाणार नसल्याचा एक समज मोदींबाबत लोकांचा झाला. मात्र, ही योजना केवळ जुमलेबाजी आहे, असं पटोले म्हणाले.

कवच योजना ही जुमलेबाजी आहे. याउलट, आमच्या सरकारच्या कार्यकाळात रेल्वेची तिकिटे स्वस्त होती. पण, आता सरकारच्या कार्यकाळात तिकीत दर तर वाढवण्यात आलेतच. पण लोकांची जीवही जात आहे. हे प्रकार अजून किती होत राहणार, असा सवाल पटोलेंनी केली.

सयाजी शिंदे 22 वर्षांनी पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी, दोन अवलिया कलाकार येणार एकत्र 

रेल्वे अपघातांवर केंद्र सरकारचे नियंत्रण नाही. केंद्र सरकार त्यांच्या मित्रांची मालगाडी अधिकाधिक कशी धावेल, हे पाहत आहे, असंही पटोले म्हणाले.

मोदींनी राजीमाना द्यावा…
पटोले म्हणाले की, लाल बहादूर शास्त्रींच्या काळातही असाच एक अपघात घडला होता. त्यावेळी त्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा दिला. आताच्या रेल्वे अपघातांच्या घटना पाहता जर मोदी सरकारमध्ये धमक असेल तर मोदींनी आपला राजीनामा द्यावा. ज्या पद्धतीने लाल बहादूर शास्त्री यांनी जबाबदारी स्वीकारली होती. त्याचप्रमाणे या सरकारनेही या अपघाताची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. हे केवळ रेल्वेमंत्र्यांचे अपयश नसून संपूर्ण केंद्र सरकारचे अपयश आहे, असेही पटोले म्हणाले.

फडणवीसांकडून मृतांना 5 लाखांची मदत जाहीर…
देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. फडणवीस म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा जवळील एका दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येईल आणि जखमींचा संपूर्ण खर्च सुद्धा राज्य सरकार करेल, अशी घोषणाही फडणवीसांनी केली.

follow us