Download App

Nana Patole : राज्यभरातील ग्रामपंचायतींमध्ये महापिछेहाट पण भाजप म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर’ पटोलेंचा टोला

Nana Patole : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील ग्रामपंचायतींच्या निकालावर प्रतिक्रिया देताना भजपवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुक निकालाबद्दल भारतीय जनता पक्षाने केलेला दावा हा खोटा व हास्यास्पद आहे. मुळात या निवडणुका चिन्हावर लढल्या जात नाहीत. त्यांनी दिलेले आकडे हे खोटे आहेत. त्यांनी ग्रामपंचातींच्या नावासह यादी जाहीर करावी. मग कळेल जनतेने कोणाच्या बाजूने निकाल दिला आहे. पण भाजप म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर’ असं आहे. अशी टीका पटोले यांनी केले. ते टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.

Gram Panchayat Election Result वर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

तसेच पटोले म्हणाले की, राज्यातील 2 हजार 320 ग्रामपंचायतींची मतमोजणी आज पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसने आतापर्यंत 589 ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा फडकवला आहे. तर 132 ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांच्या स्थानिक आघाडीने विजय मिळवत एकूण 721 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीने एकूण 1312 ग्रामपंचायतीत विजय मिळवत राज्यात आघाडी घेतली आहे.

Sonu Sood: ‘मै भी सोनू सूद’च्या चाहत्यांची भारतभर खास मोहीम; तब्बल 6645 किमीचा प्रवास करणार

मागील वर्षी झालेल्या बाजार समिती निवडणुकीतही भाजपाने असाच खोटा दावा केला होता वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. राज्यातील बहुतांश बाजार समित्यांवर काँग्रेस व मित्रपक्षांचाच विजय झालेला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतही राज्यातील जनतेने भाजपाला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे पण ‘खोटे बोल पण रेटून बोल’ अशा पद्धतीने ते विजयाचा खोटा दावा करत आहेत. नागपूर जिल्ह्यातही भाजपाचा सुपडासाफ झालेला आहे, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील आतापर्यंत 23 ग्रामपंचयातीवर काँग्रेसने दणदणित विजय मिळवला असून भाजपाच्या वाट्याला फक्त 2 ग्रामपंचायती आल्या आहेत तरीही ते स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहेत.

ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत ओबीसी आरक्षण नव्हते, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढाव्या लागल्या. त्याला भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. फडणवीस व भाजपामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले आहे. सत्तेवर आलो तर 24 तासात ओबीसी समाजाचे आरक्षण देण्याची वल्गना देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पण दीड वर्षात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण दिले नाही. याचे उत्तरही जनतेने भाजपाला दिले आहे. अशी टीका यावेळी पटोले यांनी भाजप आणि फडणवीसांवर केली आहे.

Tags

follow us