अजितदादांचा स्वभाव दादागिरीचा, मलाईच्या वाटणीत गडबडी; नाना पटोलेंचा हल्लाबोल

Nana Patole On Ajit Pawar : अजितदादांचा स्वभाव संपूर्ण महाराष्ट्राला आणि शासनकर्त्यांना माहित आहे. अनेक वर्ष त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. त्याच्यामुळे दादागिरी काय असते, हे मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पाहिली आहे. शिवसेनेतून शिंदे गट वेगळा झाला त्यांचा आरोपच अजितदादांवर होता, आता ते स्वतः सरकारमध्ये सहभागी झाले होऊन ते अर्थमंत्री झाले, त्यामुळे अजितदादांनी […]

Nana Patole Ajit Pawar Eknath Shinde Fadnavis

Nana Patole Ajit Pawar Eknath Shinde Fadnavis

Nana Patole On Ajit Pawar : अजितदादांचा स्वभाव संपूर्ण महाराष्ट्राला आणि शासनकर्त्यांना माहित आहे. अनेक वर्ष त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. त्याच्यामुळे दादागिरी काय असते, हे मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पाहिली आहे. शिवसेनेतून शिंदे गट वेगळा झाला त्यांचा आरोपच अजितदादांवर होता, आता ते स्वतः सरकारमध्ये सहभागी झाले होऊन ते अर्थमंत्री झाले, त्यामुळे अजितदादांनी आपली कारवाई सुरु केली असेल तर त्यात नवीन काही नाही, असे म्हणत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सरकारला खोचक टोला लगावला आहे.

Ahmednagar Crime : ‘ती’ ला त्रास देऊन तो पळाला, पोलिसांनी त्याला पुण्यात गाठला

नाना पटोल म्हणाले की, साखर कारखाने हा एक मलाईचा भाग आहे. त्यामुळे मलाई कोणाला जास्त मिळते? मलाईच्या वाटणीत काही गडबडी झाल्या आहेत. खरंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमी आणि सुपर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत. हे कालच्या निर्णयाने स्पष्ट झाले आहे.

इलॉन मस्कची मोठी घोषणा! फोन नंबरशिवाय ट्विटरवर करता येणार फोन

भाजप आणि विशेषतः आरएसएसचं कामच असं असतं की एखादा चेहरा समोर ठेवायचा आणि आतून सत्तेचा उपभोग घ्यायचा. ती उपभोग घेण्याची पद्धत कालच्या निर्णयाने स्पष्ट झाले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर असताना सरकार इथंच गंमतजंमतमध्ये लागलेली आहे. आम्ही अनेकदा सांगितलं की, राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे, प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळायला पाहिजे. अजूनही 17 जिल्ह्यांना पालकमंत्री नाही.

प्रत्येक जिल्ह्यात पाण्याचे टँकर सुरु केले आहेत. शेतातील पिकं वाळायला लागली आहेत. सरकार अजूनही खुर्चीच्या लढाईमध्ये लागलेले आहे. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय?नकली आकडे दाखवून आम्ही महाराष्ट्रात सगळ्यात जास्त उद्योग आणले, अशा प्रकारचा नकली कागदांचा खेळ सरकारकडून सुरु असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर केला आहे.

Exit mobile version