इलॉन मस्कची मोठी घोषणा! फोन नंबरशिवाय ट्विटरवर करता येणार फोन

इलॉन मस्कची मोठी घोषणा! फोन नंबरशिवाय ट्विटरवर करता येणार फोन

X New Feature : इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या हातात सूत्र आल्यानंतर ट्विटरमध्येच बरेच बदल करण्यात आले आहेत. त्यांनी ट्विटरचे नाव आणि लोगो दोन्ही बदलले. त्यानंतर आज मस्क यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आता ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग (Audio video calling) सुविधा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर देखील उपलब्ध असेल. मस्क यांनी त्यांच्या अधिकृत X हँडलवरून याबद्दलची पोस्ट केली आहे.

काही दिवसांपूर्वी ब्लू टिकच्या मुद्द्यामुळं चर्चेत असलेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण ट्विटर लवकरच काही नवीन फीचर्स आणण्याच्या तयारीत आहे. मस्क यांनी ट्विट करून याविषयीची माहिती दिली. मस्क यांनी ट्विट केलं की, X वर आता व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल करता येणार आहेत. हे वैशिष्ट्य लवकरच उपलब्ध होईल. हे वैशिष्ट्य iOS, Android, Mac आणि PC सह सर्व प्लॅटफॉर्मवर काम करेल, असं मस्क म्हटलं आहे.

विशेष म्हणजे, X अकाउंटच्या माध्यमातून हे ऑडिओ/व्हिडिओ कॉल्स होत असल्यानं तुमच्याकडे समोरच्या व्यक्तीचा फोन नंबर असण्याची गरज नाही. म्हणजेच आता यूजर्स फोनवर कोणाशीही त्यांचा नंबर शेअर न करता बोलू शकणार आहेत. ही वैशिष्ट्ये iPhone, Android, Apple MacBook आणि Windows किंवा इतर PC सारख्या सर्व डिव्हाईसना सपोर्ट करणार आहेत.

Letsupp Special : रोहित पवार राष्ट्रवादीत अजितदादांची जागा घेत आहेत का? 

या नव्या फीचरमुळे X आता थेट मेटाच्या व्हॉट्सअॅपशी स्पर्धा करू शकेल. विशेष म्हणजे व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉल करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, त्यासाठी तुमच्याकडे समोरच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. मात्र, X ला कॉल करताना समोरच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर तुमच्याकडे असणंर गरजेचं नसल्यामुळे लोक ते वापरण्याची अधिक शक्यता असते.

काही दिवसांपूर्वी मेटाने थ्रेड्स नावाचे अॅप लॉन्च करून ‘एक्स’च्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही दिवसांतच थ्रेड्सची हवा कमी झाली. यानंतर आता इलॉनने X मधील कॉलिंग फीचरची घोषणा करून मार्क झुकरबर्गवरच्या थ्रेड्सवर मात करण्याचा प्रयत्न केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube