Nana Patole : दिल्ली अन् गुजरातवरून चालणारं हे आउटसोर्सिंग सरकार; नाना पटोलेंचा घणाघात

Nana Patole : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यसरकारवर कंत्राटी भरती वरून टीका केली. महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांचं हे सरकार दिल्ली अन् गुजरातवरून चालणारं हे आउटसोर्सिंग सरकार आहे. अशी टीका नाना पटोले यांनी केली. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही टीका केली. काय म्हणाले नाना पटोले? ‘हे सरकारच […]

Nana Patole Ajit Pawar Eknath Shinde Fadnavis

Nana Patole Ajit Pawar Eknath Shinde Fadnavis

Nana Patole : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यसरकारवर कंत्राटी भरती वरून टीका केली. महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांचं हे सरकार दिल्ली अन् गुजरातवरून चालणारं हे आउटसोर्सिंग सरकार आहे. अशी टीका नाना पटोले यांनी केली. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही टीका केली.

काय म्हणाले नाना पटोले?

‘हे सरकारच दिल्ली अन् गुजरातवरून चालणारं हे आउटसोर्सिंग सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री गुजरातमध्ये उद्योग पाहायला गेले होते. जे उद्योग आपल्याच राज्यातून तिकडे गेले. तेच उद्योग हे पाहायला गेले. मात्र त्यांनी राज्यातीस तरूणांच्या भवितव्यासोबत खेळखंडोबा करू नये. सुरक्षेचे तीन तेरा वाजातील, महाराष्ट्राचे वेगळे अस्तित्व आहे, महाराष्ट्र खपवून घेणार नाही.’ असा इशारा देखील यावेळी नाना पटोले यांनी भाजप आणि राज्यसरकारला दिला.

‘शरद पवारांना राजीनामा द्यायचाच नव्हता’; घटनाक्रम सांगत सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट

तसेच यावेळी पुढे नाना पटोले असंही म्हणाले की, ‘शिंदे मारण्याचा कट असे आरोप लावण्यापेक्षा कारवाई करावी. ते सत्तेत आहेत. पुरावे असतील तर कारवाई करा. असा खेळ करू नका, राज्याच्या जनतेला खेळ करता लाफिंग शो थांबवा. तर आमदार अपात्रतेच्या सुनावणीवर पटोले म्हणाले की, ते नार्वेकरांचा कामकाज आहे. त्यांनी ते करावे. सुप्रीम कोर्ट लक्ष ठेवून आहे, मी त्यावर बोलणार नाही. असं पटोले म्हणाले.

NCP Crisis : ‘युद्धा’त सारं क्षम्य; तटकरे यांचा शरद पवारांना इशारा

तर राहुल गांधीवर पटोले म्हणाले की, ‘राहुल गांधी यांच्या विश्वासार्हतेची खात्री आहे. ते फेकू नाही, जनतेला आशा आहे.त्याला नाकारू शकत नाही. मोठ्या विद्यापीठात लोक त्यांना ऐकण्यासाठी जमा होत आहेत.’

Exit mobile version