Download App

Nana Patole : शेतकऱ्याची बत्ती गुल केली तर आम्ही सरकारची करु…

मुंबई : राज्यातल्या शेतकऱ्याची बत्ती गुल केली तर सरकारची बत्ती गुल करणार असल्याचा इशारा काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी नाना पटोलेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. दरम्यान, यावेळी त्यांनी महागाई, शेतकरी आत्महत्या या विषयांवर सत्ताधाऱ्यांना खेचल्याचं दिसून आलंय. तसेच देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीसांकडे उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्री असे अनेक खाते आहेत, ते विरोधी पक्षनेते असताना त्यांनी मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांचं साडेसहा हजार कोटी रुपयांचं वीजबील माफ केल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता आमचीही हीच मागणी आहे. शेतकऱ्यांना बारा तास लाईट मिळाली पाहिजे. मात्र, शेतकऱ्यांना आठ तासही लाईट मिळत नसल्याचं ते म्हणाले आहेत.

Budget Session : चोर मंडळात उद्धव ठाकरेही.., देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर पलटवार

वीजबिल न भरल्यास शेतकऱ्यांच्या लाईट कट करण्याचं राज्य सरकारकडून सुरु आहे. त्यामुळेच राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होत आहेत. त्यासोबत आज सरकारने गॅसच्या किमतीत वाढ केली आहे. तब्बल 50 रुपयांनी गॅसच्या दरात वाढ केल्याने महिलांच्या डोळ्यात अश्रू येत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

उद्धव ठाकरेंकडे राहिलेत चार कुत्रे त्यापैकी तू.. चिडलेल्या राणेंची जाधवांवर जहरी टीका

तर दुसरीकडे राज्य आणि केंद्र सरकार आपली स्वत:ची पाठ थोपटवत आहेत. भाजपच्या नेत्यांकडून देशात एक प्रकारची अर्थिक अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही नाना पटोलेंनी केला आहे. तसेच जीडीपी खाली पडला असताना देशाचे गृहमंत्री आम्हीच चांगले आहोत असं म्हणत आपली पाठ थोपवून घेत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय.

एकंदरीत या सर्व विषयांवर बोलताना नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला आहे. दरम्यान, आज विधानसभेत आमचं आंदोलन महागाई, दरवाढीवरुन सुरु असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

Tags

follow us