Nana Patole On OBC Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वादंग पेटल्याची परिस्थिती आहे. एकीकडे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange Patil) आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनीही कंबर कसली आहे. मराठा आरक्षणासाठी जाहीर सभा होत असतानाच जालन्यात ओबीसी मेळाव्यातून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर जळजळीत टीका केली. त्यावरुन राज्यात रणकंदन सुरु झालं आहे. अशातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.
Mulshi Pattern: ‘मुळशी पॅटर्न’च्या आठवणींना उजाळा देत प्रवीण तरडेंनी शेअर केला तो जुना व्हिडिओ…
नाना पटोले म्हणाले, ओबीसी आरक्षणावर काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे, काँग्रेसने आधीपासूनच जातीनिहाय जणगणनेचं अभियान सुरु केलं आहे. जातिनिहाय जनगणना केल्यानंतर राज्यात कोणता समाज किती आहे, हे स्पष्ट होणार आहे. जातिनिहाय जनगणना झाल्यानंतर ओबीसी, एससी, एसटी समाजाला न्याय देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. जातिनिहाय जनगणना झाल्यानंतर जो समाज शैक्षणिक, नोकरीत मागास आहे त्या समाजाच्या आरक्षणासाठी ओबीसी आरक्षण वाढवण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.
Rahul Gandhi : ‘पनौती’ शब्द निवडणूक आयोगालाही खटकला; BJP च्या तक्रारीची 24 तासांत दखल
ओबीसी-मराठा वाद भाजपप्रणित :
राज्यात सध्या मराठा-ओबीसी समाजामध्ये वाद लावणं हे भाजपप्रणित आहे. आम्ही राज्यातील शेतकरी, महागाई, बेरोजगारी, इ. प्रश्नांसाठी लढत आहोत. राज्यात भयानक दुष्काळजन्य परिस्थिती आहे, मात्र अद्याप या सरकारने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. सरकारने या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं, आरक्षणासंदर्भातील सुरु असलेला धुमाकूळ सरकारने आता थांबवावा आणि समाजाला न्याय द्यावा, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.
सचिनची लेक अन् रश्मिका ‘डीपफेक’च्या जाळ्यात; मोदी सरकार अॅक्शन मोडमध्ये, घेतला मोठा निर्णय
छगन भुजबळांच्या भूमिकेवर नाना पटोलेंचं मौन :
आरक्षणासंदर्भात कोणी कोणाच्या तोंडातला घास हिसकावयचा नाही. सर्वच समाजाला न्याय देण्यात यावा, ही आमची भूमिका आहे. सरकारने मराठा आंदोलकांना जे आश्वासित केलं आहे, त्या घोषणांची पुर्तता केली पाहिजे, मला कोणालाही व्यक्तीगत बोलायचं नाही. हे सर्व भाजपप्रणित सरकारचं पाप आहे. व्यक्तीगत भूमिकेवर मला बोलायचं नसल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.