Chandrashekhar Bawankule : ‘नाना पटोलेंना काय कळतंयं’; चंद्रशेखर बावनकुळेंची जळजळीत टीका

Chandrashekhar Bawankule : ‘नाना पटोलेंना काय कळतंयं’; चंद्रशेखर बावनकुळेंची जळजळीत टीका

Chandrashehar Bawankule On Nana Patole : नाना पटोले यांना काय कळतयं, या शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashehar Bawankule ) यांनी जळजळीत टीका केली आहे. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे आज मकाऊ दौऱ्यावरुन भारतात दाखल झाले आहेत. मकाऊमध्ये बावनकुळे कसिनो खेळत असल्याचा कथिक फोटोवरुन नाना पटोले( Nana Patole) यांनी बावनकुळेंवर टीकास्त्र सोडले होते. बावनकुळे यांच्या या कथित फोटोवरुन राज्यात चांगलच वातावरण तापलं होतं. त्यानंतर आज बावनकुळेंनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते मुंबईतून बोलत होते. यावेळी बोलताना बावनकुळे विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

मराठवाड्याच्या पाण्याचे आंदोलन तापले; गायकवाड थेट पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडकले!

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नाना पटोले तुम्हाला काय बोलावे, विचार करून बोला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारी महामार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेतली. आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांसाठी 50 बैठका घेतल्या आहेत. नाना पटोले यांना काय कळतं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस जेव्हा रखुमाई आणि विठ्ठलाची पूजा करतील तेव्हा राज्यातील जनतेचे भले करावे यासाठी पूजा करतील. गृहखाते अतिशय सक्रिय झालं आहे. राज्यातील जनता ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह खात्यामुळे सुरक्षित असल्याचंही बावनकुळे म्हणाले आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मकाऊमध्ये कसिनो खेळत असल्याचा कथित फोटो काँग्रेसकडून एक्सवर शेअर करण्यात आला. महाराष्ट्र काँग्रेसने एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं, “दिवाळी स्पर्धा! एका पत्याच्या pack मध्ये किती पत्ते असतात? अचूक उत्तर देणार्‍यांना Macau trip भेट.” या कॅप्शनसह चंद्रशेखर बावनकुळे यांचा कसिनो खेळतानाचा कथित फोटो शेअर केला आहे. या फोटोवरुन विरोधकांनी बावनकुळेंवर एकच हल्लाबोल चढवला होता.

Manoj Jarange : ट्रकभर गुलाल अन् फुलांनी सत्कार करतो’; जरांगेंची अजितदादांना खास ऑफर

तसेच नाना पटोले यांनीही चंद्रशेखर बावनकुळेंना या कथित फोटोवरुन सोडलं नव्हत. ते म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, तरुण बेरोजगारीने त्रस्त आहे, महागाईने जनतेला जगणे कठीण झाले आहे पण सत्ताधारी भाजपाला त्याचे काहीही देणेघेणे नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मकाऊ येथे जुगार खेळत असल्याचे फोटो मीडिया व सोशल मीडियात दिसत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बावनकुळे जुगार खेळत असल्याचा फोटो ट्वीट केला आहे, हा फोटो खरा आहे का? बावनकुळे जुगार खेळत होते का? आणि जुगार खेळण्यासाठी बावनकुळे यांच्याकडे कोट्यवधी रुपये आले कोठून? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली होती.

एवढंच नाहीतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही चंद्रशेखऱ बावनकुळेंवर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं. 19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ,veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? ते म्हणतात फॅमिलीसह मकाऊला गेले आहेत. त्यांच्या सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणतात कधीच जुगार खेळले नाहीत. मग ते नक्की काय करत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल, झाला तेवढा तमाशा पुरेसा असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube