Manoj Jarange : ट्रकभर गुलाल अन् फुलांनी सत्कार करतो’; जरांगेंची अजितदादांना खास ऑफर

Manoj Jarange : ट्रकभर गुलाल अन् फुलांनी सत्कार करतो’; जरांगेंची अजितदादांना खास ऑफर

Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून नाशिकमध्ये आहेत. येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना खास आवाहन केले. ज्याची आता जोरदार चर्चा होत आहे. अजित पवार यांनी काल पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांची बैठक घेतली. मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) जपून बोलण्याच्या सूचना त्यांनी दिल्याची माहिती आहे. पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला. आमदार आणि मंत्र्यांना भूमिका मांडताना काळजी घेण्याची तंबी दिली. तशी आता आरक्षणाचीही तंबी देऊन टाका. लगेच आरक्षण दिलं तर मी नाशिकमधूनच घरी जातो आणि तुमच्या सत्कारासाठी ट्रकभर गुलाल अन् फुलं आणतो. मराठ्यांच लाखो पोरंही आणतो. आणखी काय सन्मान पाहिजे तुम्हाला, असे जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange : ‘तू कुठं भाजी विकत होता, महाराष्ट्र सदनाचा पैसा’.. एकेरीवर येत जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल

अजितदादांनी मंत्र्यांना काय सांगितलं?

दरम्यान, काल अजित पवार यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांची बैठक घेतली. मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांनी गावबंदीची जी भूमिका घेतली आहे ती चुकीची आहे, असे मत या बैठकीत आमदार मंत्र्यांनी व्यक्त केले. त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सर्वांनी जपून बोलावे अशा सूचना अजितदादांनी दिल्याचे समजते.

छगन भुजबळांवर घणाघाती टीका 

चार दिवसांपूर्वी जालन्यातील अंबड येथे ओबीसी एल्गार सभा झाली. या सभेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या खासगी आयुष्यावर भाष्य करत टीका केली. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनीही भुजबळांवर टीका करण्याचा सपाटा सुरू केला आहे.

Chhagan Bhujbal : ‘संभाजीराजे तुम्ही फक्त एका समाजाचे नाहीत’; छगन भुजबळांनी संभाजीराजेंना सुनावलं

तू कुठे भाजी विकत होतास, कोणाचं काय करत होतास. मुंबईत काय-काय केलं. कोणत्या नाटकात आणि चित्रपटात काम केलं याची मला माहिती आहे. तू कोणाचा बंगला बळकावला हे देखील मला माहिती आहे. तू महाराष्ट्रातल्या जनतेचं खाल्लंस. महाराष्ट्र सदनाचा पैसा खाल्ला. महाराष्ट्र सदनाचा पैसा हा राज्यातील जनतेचा होता. तो पैसा तू खाल्लास. त्यामुळे तुला जनतेचा, गोरगरिबांचा तळतळाट लागला. म्हणूनच तू तुरुंगात गेला अशी घणाघाती टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube