Download App

भगवे कपडे घातले म्हणजे साधू झाले का? नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

  • Written By: Last Updated:

Nana Patole On Eknath Shinde :  हिंदू चे ठेकेदार ते झालेले नाहीत स्वतः हिंदुत्वाचे सोंग घेणारे लोक आहेत. रावणाने देखिल भगवे कपडे घालून सीतेला पळवून नेल होत. भगवा कपडा घातला म्हणजे साधू संत होता येत नाही. असा टोला कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या मंत्र्यांसोबत काल अयोध्येला श्रीरामाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावरून नाना पटोलेंनी हा टोला लगावला ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे नाना म्हणाले भगवान श्री रामाच्या नावाने पैसे लुटणारे हिंदुत्व की भगवान श्री रामाच्या नावाने भक्ती करणारे हिंदुत्व हे समजलं पाहिजे. त्यांना जनता उत्तर देईल. एकीकडे अवकाळी पावसाचा फटका बसला असताना दिखावा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला राम भक्त म्हणणार का? असा सवाल देखिल नाना पटोले यांनी यावेळी विचारला.

Bala Nandgoankar : महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर मनसे नेत्याने ओढले ताशेरे, म्हणाले… 

काँगेस पक्षाबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले आमचा सत्याग्रह महात्मा गांधींच्या विचाराचा आहे इंग्रजांच्या जुलमी व्यवस्थेला गांधींचींनी सत्याग्रहाने संपवले. आज याच सत्याग्रहा प्रमाणे या देशाचा कारभार सत्याच्या मार्गाने चालला पाहिजे हीच भूमिका आमची आहे.

अदानीबाबत बोलताना नाना म्हणाले ज्या अदानीने LIC चे पैसे लुटले, कर्मचाऱ्यांच्या फंडाचे पैसे लुटले, देशात खोट्या कंपन्या दाखवल्या, तीस हजार कोटींचा घोटाळा केला. याचाच जाब आमचे नेते राहुल गांधी विचारत आहेत परंतु त्यांच्या विरोधात खोट्या केसेस करून त्यांना झेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Tags

follow us