Download App

अधर्माच्या आधारावर राम मंदिराचे काम, सत्तेत आल्यावर मंदिराचे शुद्धीकरण करू; पटोलेंचे मोदींना प्रत्युत्तर

देशात काँग्रेस सत्तेत आल्यास राम मंदिराचे आम्ही शुध्दीकरण करणार आहोत. हिंदू धर्मातील चारही शंकराचार्यांचा या विधीला विरोध होता.

Nana Patole On Narendra Modi : नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) राम मंदिराच्या (Ram temple) उभारणीत अधर्माच्या आधारावर काम केलं. आम्ही ते सुधारून धर्माच्या आधारावर काम करू. काँग्रेस सत्तेत आल्यावर राम मंदिराचे आम्ही शंकराचार्यांच्या हस्ते शुध्दीकरण करू, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

Bollywood मध्ये पुढे येताय नव्या ऑन-स्क्रीन जोड्या; रोहित-पश्मिना ते तृप्ती-कार्तिकचा समावेश 

धुळे लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी नाना पटोले धुळे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, नरेंद्र मोदींनी केलेल्या योजना आणि राम मंदिर कॉंग्रेस काढून घेणार असल्याच्या आरोपाला पटोलेंनी प्रत्युत्तर दिलं. पटोले म्हणाले, भाजपची स्वतःची कोणतीही योजना नाही, मोफत धान्य देणार ही आमचीच योजना आहे. उलट आम्ही या योजनेत गोरगरिबांना खायचं तेल, साखर, डाळ देऊन योजना वाढवणार तसेच बेरोजगरा तरुणांच्या हाताला देखील काम देऊ.

Prasad Lad : ‘उद्धव ठाकरेंची गत उंदीर गेला लुटी…’; प्रसाद लाड यांनी डिवचलं 

राम मंदिराबाबत झालेल्या आरोपावर पलटवार करत ते म्हणाले, देशात काँग्रेस सत्तेत आल्यास राम मंदिराचे आम्ही शुध्दीकरण करणार आहोत. हिंदू धर्मातील चारही शंकराचार्यांचा या विधीला विरोध होता. आता या चारही शंकराचार्यांच्या हातून राम मंदिराचे शुध्दीकरण केले जाईल आणि अयोध्येत राम दरबार स्थापन केला जाईल. अयोध्येत श्रीरामांची मूळ मूर्ती नसून तेथे बालस्वरुपातील रामलल्ला ठेवण्यात आले. राम मंदिर उभारण्यात मोदींनी अधर्माच्या आधारावर काम केलं, आम्ही ते सुधारून धर्माच्या आधारावर काम करू असं पटोले म्हणाले.

काँग्रेस आणि आमच्या विचारसरणीत फारसा फरक नाही. आमच्या दोघांचीही विचारधारा गांधी-नेहरू यावर वाटचाल करत आहे. येत्या दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील किंवा त्यांच्यापैकी काही काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं विधान शरद पवारांनी केलं. त्यावरही पटोलेंनी भाष्य केलं. अनेक प्रादेशिक पक्ष भाजपला वैतागले आहे. त्यामुळं त्यांना कॉंग्रेस हा पर्याय वाटत आहे. त्यामुळंच शरद पवारांनी हे भाकीत केलं असावं. फक्त त्यांननी कॉंग्रेस पक्ष श्रेष्टींचा सन्मान करावा, असं पटोले म्हणाले.

follow us