मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर कॉंग्रेसनं राष्ट्रवादी-शिवसेनेसोबत जाणं पसतं केलं होतं. तेव्हापासून महाविकास आघाडी अस्तित्वात आहे. मात्र, त्यानंतर झालेल्या बहुतांश निवडणूकीत कॉंग्रेसने अनेकदा ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली होती. अधून-मधून महाविकास आघाडीत फूट पडणार अशा बातम्याही येत असतात. दरम्यान, आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी कॉंग्रेसच्या भूमिकेविषयी भाष्य केलं. भाजप विरूध्द लढण्यासाठी कॉंग्रेसने (Congress) एकला चलो रे ची भूमिका सोडली आहे, असं सांगितलं.
केंद्रीय तपास यंत्रणाचा होत असलेल्या गैरवापराविषयी काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होतं. राहुल गांधी यांनीही लंडनमधील भाषणात केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला होता. सभागृहात आमचे माईक बंद केले जातात, भारतात लोकशाही धोक्यात आली, असं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं होतं. दरम्यान, कॉंग्रेस पक्ष हा मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधत असल्याचं दिसतं. यासंदर्भात आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पटोले यांनी सांगितलं की, महाराष्ट्र हे असं राज्य आहे, जिथं महात्मा गांधींनी इंग्रजांना चले जाव म्हटलं होतं. फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा महाराष्ट्रात रुजली आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकट येतं, तेव्हा हिमालयाच्या साथीला सह्याद्री धावून गेलेला आपण पाहिलं. आता देशावरच संकट आलेलं आहे. अशा या परिस्थितीत देशावर संकट निर्माण करणारी जी व्यवस्था असेल, तिच्या विरोधात सगळ्यांची मोट बांधून त्यावर मात करणं ही कॉंग्रेसची भूमिका आहे.
ते म्हणाले. भाजप सत्तेचा दुरूपयोग करत आहे. अदानी समुहाला बॅंक, एलआयसी लूटू त्यांना दिल्या जातात. सगळ्या सरकारी संपत्तीचा लिलाव करून ती संपत्ती अंबांनींच्या घशात घातली जात आहे. भाजपला लोकशाही मान्य नसून ते हुकुमशाही पद्धतीने कारभार करत आहे. भाजपकडून सत्तेचा कसा गैरवापर होतोय, हे जनतेलाही कळंत.
Nana Patole : मी ‘नाना; आहे, दादा नाही; दिल्लीत जाऊन लॉबिंग करत नाही
राज्यातील 20 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी संपावर गेले. शेतकरी देखील रस्त्यावर उतरला आहे. सर्वसामान्य माणूस भाजपच्या राजकाराविषयी नाराज आहे. राज्यात किंबहुना देशात सगळं काही ठीक नाही आहे. राज्यात बजेट सादर झालं, तेव्हा 75 हजार पदांच्या नवीन भरतीची घोषणा झाली. मात्र, दुसऱ्याच दिवशी जीआर काडून 6 कंपन्यांना कंत्राटी पद्धीतीने जागा भरण्याचं कामं दिल्याचं त्यांनी पटोले यांनी सांगितलं.
दरम्यान, देशाला उध्वस्त करून पाहणारी भाजप ही सत्तेत असायला नको. भाजपकडून लोकशाहीवर घाला घातल्या जातोय. त्यामुळे कॉंग्रेस आज देशात भाजपच्या विरोधात उभी ठाकली आहे. स्वातंत्र्यकाळातही कॉंग्रेसने सगळ्यांना सोबत घेतलं होतं. आजवर कॉंग्रेसने देशहितासाठी कायम पुढाकार घेतला. त्यामुळं भाजप विरोधात लढण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी कॉंग्रेसने एकला चलो रे ची भूमिका सोडली, असं पटोलेंनी सांगितलं.