Nana Patole : मी ‘नाना’ आहे, दादा नाही; दिल्लीत जाऊन लॉबिंग करत नाही

Untitled Design   2023 03 16T142848.164

मुंबई : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. अनेकदा नाना पटोले हे इतरांपेक्षा वेगळी भूमिका घेतात. त्यामुळं पक्षातील अनेकजण त्यांच्यावर नाराज असल्याची बातम्याही येतात. मात्र, कॉंग्रेस हायकमांड पटोलेंविरूध्द कुठलीही कारवाई करत नाही. दरम्यान, पटोले यांनी याबाबत खुलासा करत माझं नाव नाना आहे, दादा नाही, असं सांगितलं.

आज एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पटोले यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार  रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला. यापूर्वी अनेक झालेल्या अनेक निवडणुकांत कॉंग्रेसनं भाजपला धुळ चारत विजय प्राप्त केला. मात्र, याचं पूर्ण श्रेय हे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मिळालं नाही. त्यावर उत्तर देतांना पटोले यांनी सांगितलं की, मी माझं माझं करणार माणूस मी नाही. तर आमचं म्हणणारा मी एक कार्यकर्ता आहे. निवडणूकांत भाजपने जे यश मिळवलं, ते माझं एकट्याचं यश नाही. या यशाचे अनेक वाटेकरू आहेत. त्यात अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सांगितलं होतं की, नाना पटोलेंचा कुणी माणूस होऊ नका. पक्षाचे कार्यकर्ते व्हा. अन्यथा मी कुणालाही तिकीट देणार नाही. कारण, व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो, असं त्यांनी सांगितलं.

Cheetah Helicopter Crash : अरुणाचलमध्ये भारतीय लष्कराचे ‘चित्ता’ हेलिकॉप्टर क्रॅश, पायलटचा शोध सुरू

काही दिवसांपूर्वी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकी नंतर बाळासाहेब थोरात आणि नाना पटोल यांच्यात वाद उफाळून आले होते. थोरात यांनी हायकमांडला पटोलेविरोधात पत्रही लिहिलं होतं. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये सारं काही आलबेल नाही, हे स्पष्ट झालं होतं. या सगळ्या घडामोडीनंतर हायकमांड पटोले यांच्याविरोधात जाईल, असं अनेकांना वाटलं होतं. दरम्यान, संदर्भातही पटोले यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, मी दिल्लीत जाऊन लॉंबिंग करत नाही. मी दिल्लीत गेलो की, पक्षाचे भविष्यातील प्लॅन, पक्षाचं कामकाज फक्त हायकमांडसमोर ठेवत असतो. कुणाच्या तक्रारी वैगेर काही करत नाही. त्यामुळे हायकमांडला वाटतं की, पक्षात पटोलेंच कुणी विरोधक नाहीत. महत्वाचं हे की, लॉबिंग करत. कुणी माझा असावं, असं मला वाटतं नाही, तर पक्षाचं असावं, असे पटोले यांनी सांगितलं.

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube