Narayan Rane on Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर ठाकरे आडनावाशिवाय पहिल्यांदाच दुसऱ्या व्यक्तीकडे शिवसेनेची सुत्र गेली आहेत. एकनाथ शिंदेंना ठाकरेंसारखा करिष्मा राखता येईल का? असा प्रश्न अनेकांकडून व्यक्त केला जात आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाष्य केले आहे. ‘त्यांना साहेबांची विचारधारा माहितीय पण त्यांना काम किती जमेल हे मी सांगू शकत नाही’, असे नारायण राणे यांनी मुंबई तकच्या मुलाखतीत म्हटले आहे.
राज ठाकरे एका सभेत म्हणाले होते की शिवधनुष्य पेलणं फक्त बाळासाहेबांना जमत होतं बाकीच्या किती जमेल हे माहिती नाही. याबद्दल नारायण राणे पुढं म्हणाले, बाळासाहेबांची कोणाशी तुलना होऊ शकत नाही. ते वेगळं व्यक्तिमत्व होतं. एकनाथ शिंदे माझ्या सारखा शिवसैनिक आहे. शिवसैनिक पहिला मग कार्यकर्ता, शिवसैनिक हाच कार्यकर्ता असतो, त्याला साहेबांची विचारधारा माहिती. पण त्यांना काम किती जमेल हे मी सांगू शकत नाही, असे नारायण राणे यांनी सांगितले.
‘फोडाफोडीचे राजकारण बंद करा आधी लोकांना’.. फडणवीसांच्या वक्तव्यावर पटोलेंचा संताप
ते पुढं म्हणाले की एकनाथ शिंदे शिवसैनिक आहे पहिल्यापासून, साहेबांचा फोटो किंवा व्यक्तिमत्व डोळ्यासमोर ठेवून काम करत असतो. पण तुम्हाला तुलना करायची असेल तर बाळासाहेबांनी प्रमुख म्हणून शिवसैनिक घडवले. हिंदुत्व आणि मराठी माणसांना न्याय देणे हे त्यांचे धोरण होते. मुख्यमंत्री व्हायचंय… दिल्लीत जायचंय.. पंतप्रधान व्हायचंय ही त्यांची स्वप्ने नव्हीत, असे देखील नारायण राणे यांनी सांगितले.
बाळासाहेबांना मी खुप मानतो, त्यांची आजही मला आठवण आली की मी भावूक होतो. कारण मी त्यांना फार जवळून पाहिलंय, असे नारायण राणे यांनी सांगितले. माझ्या इतकी पद महाराष्ट्रात कोणालाच मिळाली नाही. जी पदही मिळाली, त्या प्रत्येक पदाला न्याय दिला. बीएसीटी चेअरमन असो, आमदारकी असो यासह इतर अनेक पदे मी हाताळली. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते पद तर मी गाजवली आहेत त्यांना न्याय दिला, असे देखील राणे यांनी सांगितले.