‘फोडाफोडीचे राजकारण बंद करा आधी लोकांना’.. फडणवीसांच्या वक्तव्यावर पटोलेंचा संताप

‘फोडाफोडीचे राजकारण बंद करा आधी लोकांना’.. फडणवीसांच्या वक्तव्यावर पटोलेंचा संताप

Nana Patole : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसबाबत केलेल्या विधानामुळे वाद होण्याची शक्यता दिसत आहे. काँग्रेसमध्ये कुणीही राहण्यास तयार नाही. अख्खा काँग्रेस पक्ष आपल्या पाठिशी येत आहे त्यामुळे काळजी करण्याचे काहीच कारण नाही असे फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी समाचार घेतला आहे.

पटोले म्हणाले, ‘केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी डबल इंजिनचे सरकार असल्याचे सांगतात मग तरीही राज्यातील शेतकरी आत्महत्या का करत आहे ? शेतकऱ्यांना मदत करण्याची आश्वासने गेल्या एक महिन्यापासून केली जात आहेत.’

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे अनेक आमदार संपर्कात; फडणवीसांनी दिले मेगाभरतीचे संकेत, पक्ष प्रवेशाची वेळही सांगितली

‘सध्या राज्यातील शेतकरी संकटात आहे. अशा परिस्थितीत अजूनही शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी केलेला नाही. हरभरा, मका, तूर घरात पडून आहे. अशा वेळी फोडाफोडीचे राजकारण करण्यापेक्षा सत्तेचा फायदा जनतेला मिळवून द्या’, अशी जोरदार टीका पटोले यांनी केली आहे.

महाविकास आघाडीची तीन तोंडे आहेत. सकाळी संजय राऊत, दुपारी अजित पवार आणि रात्री नाना पटोले बोलतात असे फडणवीस म्हणाले. या प्रश्नाला पटोलेंनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘फडणवीसांना विरोधकांवर टीका करण्याचा अधिकार आहे. पण, त्यांच्याकडील सत्तेचा वापर स्वतः आणि बगलबच्च्यांसाठी चाललेला आहे. मंत्रालयात तिजोरी लुटली जात आहे हे आधी त्यांनी पहावे. तोडफोडीच्या राजकारणाला लगाम द्यावा’, असे ते म्हणाले.

Prithviraj Chavan मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते?

पवारांनी पटोलेंना सुनावले 

दरम्यान, राज्यात सध्या विरोधी पक्षनेते अजित पवार नॉट रिचेबल असण्याचीच चर्चा जास्त आहे. तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांच्या वक्तव्यांवरुन आघाडीत सारेच काही आलबेल आहे असे वाटत नाही. बाजार समितीतील निवडणुकीत एका ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीने हातमिळवणी केल्याच्या मुद्द्यावर  पटोले यांनी राष्ट्रवादीला थेट शेतकरी विरोधी ठरवले होते. त्यानंतर अजित पवारांनीही संतप्त होत पटोलेंना सुनावले होते. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी आणि आघाडीत फूट पडेल अशी वक्तव्ये तत्काळ थांबली पाहिजेत असे पवार म्हणाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube