पुढील निवडणुकीत ‘हा’ पक्ष राहत नाही, नारायण राणेंचा रोख कुणाकडे?

Narayan Rane Criticized Uddhav Thackeray Shiv Sena : भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेवर भाष्य केलंय. आज नारायण राणे (Narayan Rane) यांनी सहकुटुंब शिर्डीत येवून साईबाबा यांचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षावर तुफान फटकेबाजी केलीय. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत […]

Politics (6)

Politics (6)

Narayan Rane Criticized Uddhav Thackeray Shiv Sena : भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेवर भाष्य केलंय. आज नारायण राणे (Narayan Rane) यांनी सहकुटुंब शिर्डीत येवून साईबाबा यांचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षावर तुफान फटकेबाजी केलीय. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत (Shiv Sena) यांच्यावर टीका केलीय. तर ठाकरेंच्या शिवसेना पक्षासंदर्भात मोठं वक्तव्य देखील केलंय.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले ?

यावेळी नारायण राणे म्हणाले की, रामनवमीसोबत आज भाजपचा स्थापना दिवस देखील आहे. यानिमित्ताने मी साईबाबांच्या दर्शनासाठी आलोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला विकासाची दिशा दाखवली. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये चांगलं काम सुरू आहे. देश अन् राज्यात लोक कल्याणाचा कारभार सुरू आहे. त्यामुळं आता विरोधकांकडे दुसरं काम राहिलं नसल्याचं राणे म्हणाले आहेत.

PM मोदींनी केलं पंबन ब्रिजचं उद्घाटन, देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट-अप समुद्री रेल्वे पूल… वैशिष्ट्ये काय?

उद्धव ठाकरे यांच्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, आपण चांगल्या दिवशी नको त्या माणसाचं नाव घेत आहात. लोकहित, समृद्धी, विकास हे ठाकरेंचं काम नाही तर शिव्या घालणी अन् चांगल्या कामात व्यत्यत आणणं, हे त्यांचं काम आहे. म्हणून पक्ष संपत चाललाय. पुढील निवडणुकीमध्ये हा (उबाठा) पक्ष राहत नाही, असं भाकितचं नारायण राणे यांनी केलंय. तर त्यांची विधायक, सामाजित आणि सकारात्मक विचारसरणी नाहीये. त्यांच्यासोबत मी 39 वर्ष काम केलंय. माननीय बाळासाहेब ठाकरे असताना पक्ष होता. साहेब गेले अन् शिवसेना संपली, असा टोल राणे यांनी लगावला.

वर्धापनदिन तारखेनुसार, तिथीनुसार की सोयीप्रमाणे? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला आहेत. संजय राऊत दुकान चालवतात. सकाळी उठून मीडियाला बोलावलं जातं, अशी टीका त्यांनी केलीय. संजय राऊत यांचं कर्तृत्व सांगा. देश, राज्य अन् गावासाठी त्यांचं योगदान यावर देखील नारायण राणे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. तर मीडियाने राऊतांवर बातम्या देऊ नये, असं देखील मत राणे यांनी व्यक्त केलंय.

 

Exit mobile version