Download App

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नार्वेकर निर्णय घेतात; संजय राऊतांचा आरोप

  • Written By: Last Updated:

मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे घटनात्मक पदावर बसले आहेत. मात्र, ते एकपक्षीय काम करत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. नार्वेकर हे पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे बोलत आहेत. घटनात्मक पदावर बसेलेली व्यक्तींनी पक्षपाती वागू नये. त्यांनी नियम, कायदा आणि घटनेचे पालन करावं असे राऊत म्हणाले.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, त्या खुर्चीवर बसल्यावर तुम्ही पक्षाची वस्त्र आणि चपला बाहेर काढून ठेवल्या पाहिजेत. पण दुर्दैवाने राहुल नार्वेकर अध्यक्ष झाल्यापासून हे होत नसल्याचे राऊत म्हणाले. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे काम सुरु आहे.

विरोधी पक्षांना विशेषत: शिवसेनेच्या सदस्यांना सभागृहात बोलू दिलं जात नाही. ते पक्षपातीपणा करत आहे. राहुल नार्वेकर लोकशाहीचा गळा घोटत आहे. तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर राहुल नार्वेकर काम करत असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.

नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
उद्धव ठाकरे यांच्यासमोर काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी प्रस्तावावर सह्या केल्या आहेत. राष्ट्रावदीलाही याबरोबर यायचे आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रस्तावावर सही केली की नाही याबाबत मला माहित नसल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.

Tags

follow us