Download App

‘पैसा आणि सत्तेसाठी बाप बदलणारी…? शिवसेनेत प्रवेश करताच अद्वय हिरेंची भाजपावर जोरदार टीका

नाशिक : नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि भाजपा नेते अद्वय हिरे (Advay Hire) यांनी शेकडो कार्यकर्त्यांबरोबर शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उपस्थितीत अद्वय हिरे यांनी शिवसेना भवन येथे प्रवेश केला. यावेळी खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत उपस्थित होते. तेव्हा बोलताना अद्वय हिरे यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

२००९ साली स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाची लोकसभेची जागा निवडून देण्याची विनंती केली. तेव्हापासून मी भाजपासोबत काम करत आहे. भाजपात गेल्यावर सर्वजण पक्ष सोडून गेले. देशामध्ये सोनिया गांधी याना पंतप्रधान करण्याची अपेक्षा होती. अशा परिस्थितीत मंत्र्याला लोकसभेत पाडून भाजप पक्षाचा उमेदवार निवडून आणला. सरपंच आणि जिल्हा परिषदमध्ये भाजपाची सत्ता आणली. पण, आता ५० गद्दार भाजपाच्या मांडीवर आता बसल्याने त्यांना आता आमची गरज राहिली नाही, अशी टीका अद्वय हिरे यांनी केली.

कोणत्याही व्यक्तीगत पदाकरिता भाजप पक्षाकडे कोणतेही मागणी केली नाही. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली. तेव्हा आंदोलन करण्यात आलं. पक्षाने शेतकऱ्याला मरू दिलं, मात्र वाचवण्याकरिता भाजपाचे सरकार उभं राहू शकलं नाही. यामुळे भाजप पक्षाचा त्याग केला, असं अद्वय हिरे यांनी सांगितलं.

कालच्यापासून भाजपाला माझी अचानक आठवण आली. प्रदेशाध्यक्षांपासून सर्वांचे फोन येण्यास सुरवात झाली. त्यांना स्पष्टपणे सांगितलं की कितीही खोके, कितीही सत्ता दिली, तरी उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द कधी मोडणार नाही. पैसा आणि सत्तेसाठी बाप बदलणारी अवलाद माझी नाही. उत्तर महाराष्ट्रात शिवसेना पक्ष उभा करण्यासाठी काम करु. पुढील आगामी काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरेंना बसल्याशिवाय राहणार नाही,” असे म्हणत अद्वय हिरे यांनी शिंदे व फडणवीस सरकारवर टीका केली.

Tags

follow us