Download App

Nashik Election भाजप नवीन ट्विस्ट आणणार? सुजय विखे पाटील यांचं वक्तव्य

नाशिक : नाशिकमध्ये पदवीधर मतदारसंघाचे (Nashik) चित्र रात्रीतून बदलण्याची क्षमता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, असं वक्तव्य भाजप नेते खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केलं आहे. यामुळे नाशिक पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना पाठिंबा दिला. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Patil) यांच्याशी त्यांची थेट लढत होणार असल्याने आता पुन्हा एकदा ट्विस्ट आला आहे.

याबाबत भाजप खासदार सुजय विखे यांना विचारले असता, ते म्हणाले की, “हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) योग्य वेळी पक्षाचा निर्णय देतील. निवडणूक जवळ आली असली, तरी एका रात्रीमध्ये निवडणूक बदलण्याची क्षमता नगर जिल्ह्याच्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्तेमध्ये आहे. ज्या माणसाचं नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून येईल, त्याला आम्ही पाठिंबा देणार आणि एका रात्रीतून चित्र बदलून टाकू. अशी क्षमता प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये आहे, याची अनुभूती सगळ्या जिल्ह्याला येणार आहे.

जिल्ह्यात काँग्रेस पक्षात कुणी नव्हत, यामुळे कुणी राजीनामा दिल्याने काँग्रेस मोकळी होत नाही. संगमनेर सोडून जिल्ह्यामध्ये काँग्रेस कुठेच जिवंत नसल्याचा टोला भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी लगावला आहे. नाशिक पदवीधरच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अवस्थता आहे, जिल्हाधक्षांनी राजीनामा दिला आहे. याबाबत खासदार सुजय विखेंना विचारले असता त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.

Tags

follow us