Nashik MLC Election: संकटमोचक गिरीश महाजन अडकले कात्रीत ! निकटवर्तीय दोघांनी शड्डू ठोकला

Nashik MLC Election-जागा वाटप झालेले नसताना मंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या दोन निकटवर्तीयांनी उमेदवारी दाखल केलीय.

Girish Mahajan

Girish Mahajan

Nashik MLC Election: राजकीय संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. महायुतीमध्ये अद्याप जागा वाटप झालेले नाही. नाशिकच्या जागेवर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी तिन्ही पक्षांनी दावा ठोकलाय. परंतु भाजप (BJP) आणि शिवसेनेमध्ये (Shivsena)जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. जागा वाटप झालेले नसताना मंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या दोन निकटवर्तीयांनी उमेदवारी दाखल केलीय. तर दुसरीकडे शिवसेनेकडून दोघेही जण जोरदार तयारी करत आहेत. आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांची पत्नीही रिंगणात उतरण्याची तयारीत आहे.


पुण्यातील विषारी मृत्यू तांडवाचं भिवंडी कनेक्शन; तुकाराम मुंढेंचा थेट प्रहार, ‘मिथेनॉल’चे घबाड जप्त

भाजपकडून नाशिक शहर उपाध्यक्ष निलेश बोरा आणि नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते दोघांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शड्डु ठोकलाय. बोरा आणि गीते या दोघांनीही विधानपरिषदेच्या जागेसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज खरेदी केलीय. दोघेही मित्र असून, गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत. गणेश गिते यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सगळ्या गोष्टी कॅमेरावर बोलता येत नाहीत… तनपुरेंच्या भाजपप्रवेशानंतर सुळे नेमकं काय म्हणाल्या?

त्यांनी भाजपकडून एक व अपक्ष एक असे दोन अर्ज दाखल ककेले आहे. गणेश गितेंनी भाजपकडून अर्ज भरुन नाशिकच्या रणधुमाळीतील ट्विस्ट वाढवला आहे. त्याचबरोबर एक दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्यासोबत माझी या जागेबाबत यापूर्वी चर्चा झाली होती. या जागेसाठी त्यांनी मला शब्द दिला होता. त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीतर्फे फॉर्म भरतोय, असा दावा गिते यांनी केला.


नाशिकच्या जागेवर शिवसेनेचा दावा

नाशिकच्या जागेवर शिवसेनेने दावा सांगितले आहे. गेल्यावेळी शिवसेनाचा आमदार होता. त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे, अशी मागणी होत आहेत. त्यात शिवसेनेकडून दोन दिग्गज उमेदवारी मागत आहे. नांदगावचे आमदार सुहास कांदे यांची पत्नी अंजुम कांदे, नरेंद्र दराडे हे उमेदवारी मागत आहेत. त्यात नरेंद्र दराडे यांनी तयारी सुरू केली आहे. सोमवारी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यात दराडे यांना एकनाथ शिंदे यांनी शब्द दिल्याची राजकीय चर्चा आहे.

Exit mobile version