Download App

जरांगेंना पेट्या द्यायच्या अन् स्वत:ची खुर्ची पक्की करायची, नवनाथ वाघमारेंचा सत्तारांवर आरोप

जरांगे पाटील यांना पेट्या द्यायच्या आणि आपलं स्थान भक्कम करण्याचा सत्तार यांचा पयत्न असल्याचा गंभीर आरोप वाघमारे यांनी केला.

  • Written By: Last Updated:

Navnath Waghmare on Abdul Sattar : शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी बुधवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली. अब्दुल सत्तार आणि जरांगे पाटील यांच्यात सुमारे 3 तास चर्चा झाली. दरम्यान, या बैठकीवेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशीही फोनवर चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान,आता अब्दुल सत्तार आणि जरांगे यांच्या भेटीवर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांनी जोरदार टीका केली आहे.

अजित पवार-शरद पवार गटाचे कार्यकर्ते भिडले; मंत्री दिलीप वळसे पाटलांसमोरच गदारोळ 

नवनाथ वाघमारे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. सत्तार आणि जरांगे यांच्या भेटीविषयी विचारले असता ते म्हणाले की, विधानसभा निवडणूक जवळ आल्याने स्वत:ची खूर्ची पक्की करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना पेट्या द्यायच्या आणि आपलं स्थान भक्कम करण्याचा सत्तार यांचा पयत्न असल्याचा गंभीर आरोप वाघमारे यांनी केला.

Ground Zero : लोकसभेला शॉक… आता बावनकुळेंना विधानसभाही जड जाणार? 

पुढं वाघमारे म्हणाले की, अब्दुल सत्तार मांडवली करण्यासाठी आले असतील. जरांगे यांना पैसे, रसद देण्यासाठी आले असतील. अब्दुल सत्तार हे भ्रष्टाचारी आणि गद्दार माणूस आहेत ते शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणारे गद्दार आहेत, अशी जहरी टीकाही वाघमारे यांनी केली.

दरम्यान, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. या पराभवाला अब्दुल सत्तार जबाबदार असल्याची भावना भाजप नेत्यांमध्ये आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत सत्तार यांना मदत करणार नसल्याची भूमिका भाजप नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे सत्तारांच्या अडचणी वाढू शकतात. पण जर भाजपने आपल्या विरोधात काम केल्यास आपण देखील इतर मतदारसंघात त्याच पद्धतीने काम करू, असा अप्रत्यक्ष इशारा सत्तारांनी भाजपला दिला.

जरांगे आणि सत्तार यांच्या भेटीत शेतकऱ्यांच्या आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची सांगितल्या जातं. मात्र, भाजप आणि सत्तार यांच्यातील वाढत असलेली दरी पाहता सत्तारांनी जरांगेच्या भेट घेण्यामागे काही राजकीय खेळी आहे का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

follow us