मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगानं (Central Election Commission) शिवसेना (Shiv Sena) आणि पक्षाच निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Shiv Sena Symbol) शिंदे गटाला (Shinde Group) दिलं. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षातला (Maharashtra Political Crisis) हा ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर काय परिणाम होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान यावर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. नवनीत राणा (Navneet Rana) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
जो रामाचा नाही, हनुमानाचा नाही त्याच्याकडे धनुष्यबाणाचे काम नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांची विचारधारा पुढे जिवंत ठेवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तर भोलेनाथाने उध्दव ठाकरेंना चांगलाच प्रसाद दिला आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
नवनीत राणा यांनी यापुर्वीही अनेकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिल्यानंतर नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची एकही संधी सोडलेली नाही.
दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. त्यावर प्रतिक्रिया देतांना नवनीत राणा म्हणाल्या की, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवले नाही ते सत्तेसाठी काय संघर्ष करू शकणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांची विचारधारा आणि धनुष्यबाण चिन्ह पुढे नेतील असा माझा ठाम विश्वास आहे.
एकनाथ शिंदे यांचाच शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर हक्क आहे. बाळासाहेंबाच्या विचारांवर चालणाऱ्यांनाच ते निवडणूकीत उतरवतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जो राम हनुमान का नहीं उनके पास धनुष्य बाण का क़्या काम, अशी टीका करत ठाकरेंवर निशाणा साधला आहे
जो #राम का नहीं, जो #हनुमान का नहीं वो किसी काम का नहीं और धनुष बाण उसका नहीं- निर्दलीय सांसद नवनीत राणा #शिवरात्रि #shivarathri #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray pic.twitter.com/dIpu151AFN
— Suraj Ojha (@surajojhaa) February 18, 2023
बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना उद्धव ठाकरे यांनी बुडवली. अजुनही वेळ गेलेली नाही, जर उध्दव ठाकरे यांना बाळासाहेबांची विचारधारणा जिवंत ठेवायची असेल तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत यावे, असे आवाहनही त्यांनी ठाकरेंना केलं आहे.
Sapana Gill : पृथ्वी शॉ सोबतचा व्हिडीओ व्हायरल; कोण आहे सपना गिल?