Download App

‘आमची डिग्री एकच, जेल रिटर्न’; मलिकांच्या भेटीनंतर भुजबळांची मिश्किल टिप्पणी

  • Written By: Last Updated:

Chhagan Bhujbal met Nawab Malik : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना दोन महिन्यांसाठी वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला. दीड वर्षानंतर ते 14 ऑगस्ट रोजी आपल्या घरी परतले. राष्ट्रवादीत फूट पडल्याने मलिक कोणत्या गटात सामील होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काल अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी त्यांची भेट घेतली आहे. तर आज मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी मलिक यांची भेट घेतली.

छगन भुजबळ यांनी आज नवाब मलिक यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी दोघांत बराच वेळ चर्चाही झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे कळू शकलं नाही. अजित पवार गटात सहभागी होण्यासाठी मलिकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोलल्या जातं. या भेटीवेळी माध्यमांशी बोलतांना भुजबळ यांनी मलिक हे आमचे सहकारी असून,आमची डिग्री एकच, आम्ही जेल रिटर्न असल्याची मिश्लिक टिप्पणी केली.

Video : शिकारीसाठी आलेल्या बिबट्याला माकडांनी केला चितपट; थरारक व्हिडीओ आला समोर 

या भेटीत काय चर्चा झाली असं विचारलं असता भुजबळ यांनी सांगितलं की, मलिकांना किडनीचा प्रॉब्लेम आहे. न्यायदेवतेने त्यांचा ऐकलं. आता तब्येत सांभाळा. त्यासाठी चांगल्या हॉस्पिटलमध्ये जा. नीट व्हा, मग बघू काय करायचं ते, असा सल्ला मलिकांना दिल्याचं भुजबळ यांना सांगितलं.

शरद पवारांविषयी भुजबळांना विचारलं असता ते म्हणाले, आमची पार्टी एकच आहे. पवार साहेब पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतच आहेत. माझा फोटो लावू नका, असं त्यांनी रागात म्हटलं असेल. पण, मंत्रालयात मी पण पवार साहेबांचा मोठा फोटो लावला आहे. ते आमचे नेते आहेत आणि आम्ही प्रेमाने त्यांचे फोटो लावतो. प्रेमाने आणि आस्थेने कोणाचा फोटो लावणं हा गुन्हा आहे असं मला वाटत नाही. भाजपसोबत न जाण्याची भूमिका ही त्यांची पहिल्यापासूनचं असल्याचं भुजबळांना सांगितलं.

शरद पवारांना सोबत घेतलं तर अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळेल, अशी अट मोदींनी अजित पवारांपुढं ठेवली. त्यामुळंच ते सातत्याने शरद पवारांची मनधरणी करत असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. यावरही भुजबळांनी भाष्य केलं. ते म्हणाले, नरेंद्र मोदी कधी सांगायला गेले वड्डेटीवारांना? त्यांच्या दाव्याचा या भेटीशी कुठलाही संबध नाही. उगाच मनात आल की बोलायचं, याला अर्थ नाही.

दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने मलिक यांच्यावर कारवाई केली होती. मंत्री असताना त्यांच्यावर कारवाई झाली. यानंतर राज्यात शिवसेनेत बंडखोरी होऊन महाविकास आघाडीचे सरकार पडले. त्यानंतर 2 जुलै रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादीविरोधात बंड करून सत्ताधारी पक्षाला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. हे आव्हान स्वीकारत शरद पवार यांनी पुन्हा राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. त्यात नवाब मलिक यांना जामीन मिळाला. ते तुरुंगातून बाहेर येताच दोन्ही गटाचे नेते वारंवार त्यांच्या भेटी घेत आहेत. मलिक हे अजित पवार यांना पाठिंबा देतील, असे भुजबळ म्हणाले होते. सरळ सरळ त्यांनी तसा दावा केला होता. मलिक हे पवारांचे खरे कार्यकर्ते असल्याचा दावा शरद पवार गटाने केला होता. त्यामुळे आता नवाब मलिक काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us